Marathi Manus

Stay Up to Date With Us

‘या’ ५ गोष्टी आचरणात आणा आणि कोणतंही ध्येय सहज साध्य होईल

नमस्कार मंडळी

आचार्य चाणक्य लोकांना त्या गोष्टी सांगतात, ज्या जीवनासाठी खूप उपयुक्त आहेत. यामुळेच शेकडो वर्षे उलटून गेल्यानंतरही चाणक्य नीतिची लोकप्रियता आणि महत्त्व जराही कमी झालेले नसून . आजही मोठ्या संख्येने लोक चाणक्य नीतिचा अभ्यास करत असतात

आणि त्यात लिहिलेल्या गोष्टींचे आचरण करतात. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जो कोणी या ५ गोष्टींचे पालन करत असतो , त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.

या नियमांचे, सवयींचे पालन करणारे लोक कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होत असतात . कोणत्या आहेत या चाणक्यंच्या ‘५’ अनमोल गोष्टी, जाणून घ्या .

चाणक्य नीतिनुसार, एकदा तुम्ही कोणतेही काम सुरू केले की, तुम्हाला अपयशाची भीती वाटू नये. तसेच, या भीतीपोटी तुम्ही हातातले काम मध्येच सोडू नये. जे लोक नेहमी आपले काम प्रामाणिकपणे करत असतात त्यांचा नक्की विजय होत असतो .

चाणक्यंच्या या शिकवणीनुसार, व्यक्तीने योग्य संधी आल्यावर आपली प्रतिभा दाखवायला चुकू नका . संधी आल्यावर जे आळस करतात, असे लोक पुढे डोक्याला हात लावून बसतात आणि आयुष्यभर पश्चाताप करत असतात .

कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सदैव तत्पर रहायला हवे . कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि तिचा फायदा करून घेण्यासाठी नेहमी सतर्क रहायला हवे . जो व्यक्ती या गोष्टी लक्षात ठेवत असतो ,

त्याला आयुष्यात अपयशाचे तोंड कधीच पाहावे लागत नाही. चाणक्य नीतिनुसार जे लोक खोटे बोलत असतात , त्यांनाच अपयश येत असते कारण, खोटे बोलणे कोणालाही आवडत नाही. खोटे बोलून आपले काम करून घेणारा एक ना एक दिवस पकडला जातोच .

जेव्हा, लोकांना त्याचे सत्य कळते, तेव्हा त्याला मान झुकवावीच लागतेच . अशा लोकांचे भर समाजातही हसू होत असते चाणक्य नीतिनुसार , शिक्षकाकडून शिक्षण घेताना कधीही लाज वाटू देऊ नये . विद्यार्थ्याने शिक्षकाला प्रश्न करताना कधीही संकोच करू नये.

जे विद्यार्थी शिक्षकांना मोकळेणाने प्रश्न विचारू शकत नाहीत, त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव कायम राहतो. चाणक्य नीतिनुसार, माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा राग असतो . रागाने माणसाची चांगली विचारशक्ती नष्ट होत असते .

रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय नेहमीच चुकीचा असतो. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.