नमस्कार मंडळी
माणसाने जास्त चांगलं असू नये कारण जंगलामध्ये सगळ्यात आधी झाडे सरळ असतात तीच कापली जातात असे अनेक शक्तिशाली विचार मांडणारे आर्य चाणक्य हे जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक होऊन गेले आहे. असे म्हणतात ज्या आर्य चाणक्य यांचे विचार जीवनात अमलात आणतात त्यांचे आयुष्य सर्वांगानी सुखी आणि आनंदी होते. आज आपण आर्य चाणक्य यांनी पैशाबद्दल सांगितलेले पाच नियम हे जाणून घेणार आहोत. याचे पालन तुम्ही केले तर आयुष्यात तुम्हाला पैसे कधीही कमी पडणार नाही
चला तर मग जाणून घेऊयात पहिला नियम कोणतेही काम चालू करायच्या आधी नियोजन करा . इंग्लिश मध्ये एक म्हण आहे पाच मिनिटं कामाचे नियोजन तुमचा एक तास वाचवतो. यावरून नियोजनाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला समजले असेल लोक साधा पैशाचा हिशोब ठेवत नाही तर नियोजन लांबच राहिले चाणक्य म्हणतात. तुमच्या कोणत्याही कामाचे योग्य नियोजन तुम्हाला चांगला परिणाम देते कारण ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीची स्पष्टता असते
त्यावेळेस तुम्ही निर्भय असतात तुमचे मन शांत असते तुम्ही कधी विचार केले पुढच्या पाच वर्षात दहा वर्षात वीस वर्षात तुमच्याकडे किती पैसे असतील तुमच्या मुलांच्या शिक्षणाला किती पैसे लागणार आहेत त्याचे नियोजन तुम्ही केले आहे का रिटायरमेंट नंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे लागतील याचे नियोजन तुम्ही केले आहे का अशा अनेक गोष्टींचे नियोजन जर तुम्ही केले नसेल तर तुम्ही श्रीमंत होण्याची अपेक्षा कशी करू शकता. त्यामुळे भविष्यकाळात जर पैसा कमी पडू द्यायचा नसेल तर आजपासूनच पैशाची नियोजन करायला सुरुवात करा
दुसरा नियम पैशाचा नेहमी आदर करा चाणक्य म्हणतात पैशाला नेहमी आपल्या मित्र प्रमाणे समजा त्याचा नेहमी आदर करा म्हणजे काय पैशाबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका जसे की पैसे सर्व दुःखाचे मूळ आहे. पैसे हाताचा मळ आहे. पैशामुळे माणूस लोभी होतो. असे विचार तुम्हाला पैशांचा पासून दूर नेतात त्यामुळे तुमच्याकडे जे काही धन आहे त्याचे रक्षण करा वायफळ खर्च करून त्याची नासाडी करू नका कारण आज जर तुम्ही पैसे वाचवाला तर उद्या तोच पैसा तुम्हाला वाचवेल पैशाची अशा ठिकाणी गुंतवणूक करा जेणेकरून त्याची नेहमी वाढ होईल
तिसरा नियम घर नेहमी स्वच्छ ठेवा घरातील वातावरण नेहमी प्रसन्न ठेवा चाणक्य म्हणतात तुमचे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा घरातील वातावरण नेहमी प्रसन्न आणि शांत ठेवा जे घर अस्वच्छ आहे ज्या घरात नेहमी भांडणे होतात ज्या घरात नेहमी ताणतणावाचे वातावरण असते त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे घरामध्ये एकमेकांबरोबर प्रेम पूर्ण व्यवहार ठेवा आई वडिलांचा आदर करा मुलांवर नेहमी चांगले संस्कार करा आशा घरावर माता लक्ष्मी चा आशीर्वाद कायम असतो
चौथा नियम दानधर्म करा निसर्गाचा नियम आहे जे आपण देतो ते अनेक पटीने आपल्याकडे येते शास्त्रामध्ये दानधर्म ला विशेष महत्व दिले गेले आहे आज कालच्या जगामध्ये लोक इतके स्वार्थी झाले आहेत की गरजूला दान करणे हेच लोकं विसरून गेले आहेत. क्षमता असून सुद्धा जी लोकं दानधर्म करत नाही अशा लोकांवर ती माता लक्ष्मी नाराज होते .
पुढे चाणक्य असेही म्हणतात दिखाव्या पोटी दानधर्म करू नका कारण दिखाव करण्याच्या नादामध्ये तुम्ही कंगाल होण्याची शक्यता असते ज्याप्रमाणे अतिसुंदर असल्याने सीतेचे अपहरण झाले होते.अति गमंडी प्रमाणामुळे रावण मारला गेला.आणि आति दानशूर पण दाखवल्यामुळे बाली भुईसपाट झाला होता. त्यामुळे दानधर्म नेहमी आपल्या ऐपतीप्रमाणे आणि गरजूला करा
पाचवा नियम पैसे नेहमी कष्टाने आणि प्रामाणिक पणे कामवा हा नियम खूपच महत्त्वाचा आहे चाणक्य म्हणतात चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा हा जास्त काळ टिकत नाही आणि तो आला तरी त्याबरोबर अनेक समस्या व संकटे घेऊन येत असतो लोकसत्तेचा मार्गाने पैसे कमी होतात व त्यांच्या घरांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होत असते.
मुळात त्यांना हेच कळत नाही या चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा मुळे हे अडचणी घरांमध्ये निर्माण होत आहेत. चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा हा घर बरबाद करतो. चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा हे आयुष्य बरबाद करतो हे अटळ सत्य आहे. पैसे भरपूर कमवा पण ते कष्टाने आणि प्रामाणिक च्या मार्गने असले पाहिजे . असे हे आर्य चाणक्य ने सांगितलेली पैशांची पाच नियम