तुमची सिंह राशी असेल तर नक्की जाणून घ्या स्वभाव,गुण, आजार,पैसा

नमस्कार मित्रांनो,

सिंह रास आहे म्हणलं की माणूस थोडा घाबरतो, नावातच दरारा आहे. नावाप्रमाणेच ही रास आहे, अग्नीतत्वाची ही रास आहे आणि याच चिन्ह सिंह असेच आहे.ही व्यक्ती स्थिर असते आणि बऱ्यापैकी या राशीच्या व्यक्तीचे खांदे रुंद असतात, नाक सरळ असत आणि चेहऱ्यावर वेगळे तेज असते. यांची नजर खुप तीक्ष्ण असते. ही लोक प्रचंड महत्वकांक्षी असतात , ही लोक स्पष्ट असतात पण मनमिळाऊ असतात.

सिंह राशीचा स्वामी हा सूर्य असतो आणि सूर्य हा ब्रम्हांडाचा राजा आहे त्यामुळे यांना दुःख वगैरे कवटाळून बसणे जमत नाही. यांच्याकडे काम करण्याची शक्ती भरपूर असते तसेच विचार करण्याची शक्ती असते त्यामुळे यांच्याकडून लोक प्रेरणा घेऊ शकतात. यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते.ही लोक प्रचंड हुशार असतात त्यामुळे ही लोक नियोजन बरोबर करतात.

अग्नी तत्वाची रास असल्यामुळे जर कधी राग आला तर स्वतःवर यांचा कंट्रोल राहत नाही. ही लोक प्रेमात बऱ्यापैकी स्थिर असतात, ही लोक एकनिष्ठ राहतात. स्वतःच्या जबाबदाऱ्या हे पूर्ण करतात त्यामुळे सिंह राशीचा मुलगा असो किंवा मुलगी ते फक्त एकच विचार करत असतात की आपण या घराला कधी सपोर्ट करणार.

मागुन मान मिळवणारी किंवा खाणारी ही सिंह रास नाही. स्वतःच्या रुबाबावर ही लोक खर्च करतात. सिंह राशीच्या लोकांकडे नेतृत्व गुण असल्यामुळे आणि प्रचंड सामाजिक असल्यामुळे या व्यक्ती समाजामध्ये नेते किंवा राजकारणी असू शकतात. यांचा व्यवसाय काय असू शकतो? तर या व्यक्ती प्रशासकीय अधिकारी गव्हर्नमेंट संबंधित नोकरी याना मिळू शकते.

एक चांगला नेता होण्याची यांच्यात कुवत असते, प्रबंधक मॅनेजर म्हणून ही लोक काम करू शकतात. सल्ला हे लोक चांगला देऊ शकतात त्यामुळे हे एक सल्लागार बनू शकतात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही लोक चांगला व्यवसाय करू शकतात. पोलीस, आर्मी किंवा कायद्याचा अभ्यास असो या सगळ्या क्षेत्रामध्ये ही लोक चांगलं यश मिळवू शकतात.

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की व्यवसाय करताना पैशाचा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करा कारण ही लोक भावनेच्या भरात ही कधी कधी व्यवसाय करतात आणि नंतर यांना पैसे वसूल करता येत नाही कारण या लोकांना मागणे जमत नाही. सिंह राशीच्या व्यक्तीला आजार काय काय होऊ शकतात?

सिंह राशीची व्यक्ती सहसा आजारी पडत नाहीत, ही लोक सदृढ असतात आणि कधी जर आजारी पडली तर ही लोक लगेच ठीक होतात. रक्तवाहिन्या, कणा आणि हृदयाशी संबंधित आजार यांना होऊ शकतात.यांचा शुभ वार काय आहे? सोमवार आणि शनिवार सोडला तर बाकीचे पाचही दिवस यांना शुभ आहेत, जी काय महत्वाची काम आहेत ती या दिवशी तुम्ही करू शकता.

या राशीची शुभ रत्न काय आहेत? माणिक, पोवळे आणि पाचू हे यांचे भाग्यरत्न आहेत. या राशीचे शुभ रंग काय आहेत? केशरी, सोनेरी, लाल आणि हिरवा हे चार रंग यांनी जास्त वापरायचे आहेत कारण रंग हे माणसाच्या आयुष्यात कुठे ना कुठे प्रभाव टाकतात.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *