मंगळवारच्या दिवशी गुपचुप इथे जाळा एक लवंग आणि कापूर , एका रात्रीत चमत्कार बघायला मिळेल.

नमस्कार मंडळी,

आयुष्यामध्ये खूप अडी अडचणी येतात , सतत काही ना काही संकटे येत असतात.कधी कधी असते वाटते कि चारही बाजूने आता तुम्ही फसलेले आहात आणि त्यामधून बाहेर पडणे खूप अवघड झाले आहे. माणसाचे ग्रह बदलले कि नशीब बदलायला वेळ लागत नाही. ग्रहांचे रशिपरिवर्तन हे माणसाला कधी सुख तर कधी दुःख देत असतात .

कधी कधी असे वाटते कि आता आपण हरलो आहोत , कसलीच शक्ती , हिम्मत नाही राहिली काही करायची , एकदम सगळे सोडून द्यायची इच्छा होते तेव्हा फक्त श्री हनुमान ला शरण जा. मंगळवार हा श्री हनुमानांचा दिवस असतो. त्यादिवशी हनुमानाच्या मंदिरात गेलात किंवा हनुमान चालीसा चा पाठ केलात तर बजरंगबली तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील .

जे काही संकटे आहेत त्यांना सामोरे जायची शक्ती देतील किंवा दूर सुद्धा करतील.चला तर पाहुयात मंगळवारी कोणता साधा उपाय केल्याने धन संपत्ती च्या बाबतीत असलेल्या समस्या दूर होऊन सुख समृद्धीचे दिवस येतील. या साठी तुम्हाला लागणार आहे कापराची एक छोटी वडी आणि एक लवंग . हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चना केली जाते , लोकांचा खूप विश्वास आहे , अगदी मनोभावे ते पूजा करतात .

पूजा करत असताना किंवा कोणतेही धार्मिक कार्य करत असताना कापूर हा लागतोच . खूप महत्वाचा घटक आहे हा. असे मानले जाते कि रोज कापूर घरामध्ये किंवा उंबरठ्यावर दोन्ही बाजूने जाळला कि नकारात्मक गोष्टी घरात प्रवेश करत नाही. धन राहत नसेल किंवा विनाकारण पैसा खर्च होत असेल तर हा उपाय नक्की करून पहा.

जेव्हा संध्याकाळी तुम्ही घरामध्ये देवपूजा करत असाल, मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. जर तुमच्यावर कापूर नसेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये २ लवंग टाकून पूर्ण घरामध्ये तो दिवा फिरवायचा आहे. आणि जर कापूर असेल तर एका ताटली मध्ये कापूर घेऊन २ लवंग ठेवून ते जाळायचे आहे आणि देवाची आरती करायची आहे.

देवांना त्याने ओवाळायचे आहे आणि पूर्ण घरामध्ये दाखवायचे आहे. हा उपाय केल्याने धन संपत्ती वाढेल आणि आर्थिक समस्या दूर होईल.ज्योतिषशास्रानुसार मंगळवार च्या दिवशी चांदीच्या ताटामध्ये कापूर आणि २ लवंग जाळले तर त्या घरामध्ये कधीच पैसाची कमी नसते. तिजोरीमध्ये पैसा अगणित वाढत जातो. माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आर्थिक समस्या नष्ट होतात.घरामधून दरिद्री नष्ट होते.

सुख व शांतीसाठी, गरिबी दूर करण्यासाठी , कोणी तुमच्या रागावले असेल तर हा उपाय नक्की करा. हा उपाय करताना तुमच्या मनातील इच्छा तुम्ही बजरंगबली समोर बोलून दाखवा . तसेच अजून एक गोष्ट म्हणजे अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये कापूरचे तेल टाकले तर ते खूप भाग्यशाली मानले जाते.जर नशीब साथ देत नसेल तर हा उपाय मंगळवार पासून सुरु करा..काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल.

जर घरामध्ये खूप भांडणे होते असतील, सतत वाद विवाद होत असतील , शांती ,समाधान नसेल तर कापराची एक वडी तुपामध्ये बुडवून जाळायची आहे आणि पूर्ण घरामध्ये ते फिरवायचे आहे.यामुळे घरामध्ये होणारे वाद बंद होतील .वास्तुदोष असेल तर देवघरामध्ये हा कापूर ठेवावा त्याने वास्तुदोष निघून जाईल आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण होईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *