Marathi Manus

Stay Up to Date With Us

तूळ राशीत केतु ग्रह करणार प्रवेश, या राशींना मिळणार नशिबाची साथ

नमस्कार मंडळी

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका निश्चित कालावधीनंतर संक्रमण करत असतो . या संक्रमणाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो . हे संक्रमण काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरत असते . छाया ग्रह केतू मंगळाचे अधिपत्‍य असलेल्या वृश्चिक राशीतून १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:१८ वाजता शुक्राचे अधिपत्य असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार असून .

केतू ग्रह सुमारे १८ वर्षांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. केतूच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर असेल, परंतु तीन राशी आहेत ज्यांना या राशीतून विशेष फायदा होऊ शकणार आहे . चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशीमकर: या राशीला १२ एप्रिलपासून चांगले दिवस सुरू होऊ शकतात.

कारण केतू ग्रह तुमच्या राशीच्या अकराव्या स्थानात भ्रमण करेल. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. म्हणून, यावेळी आपण अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळवू शकता. यासोबतच व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे . यासोबतच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असणार आहे .

व्यवसायात नवीन करार पूर्ण करू शकणार आहे . ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो . एकंदरीत केतूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहणार आहेव

कर्क राशी – केतू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध ठरू शकतो . कारण केतू ग्रह तुमच्या चौथ्या स्थानात प्रवेश करणार आहे . या स्थानाला सुखाचे स्थान म्हणतात. त्यामुळे केतूची ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी उत्साहवर्धक ठरू शकते. ज्यांना विविध भाषा शिकण्यात रस आहे

किंवा भाषांतरकार म्हणून करिअर करायचे आहे त्यांच्यासाठीही हा काळ विशेष अनुकूल असणार आहे . यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. अविवाहित लोकांचं या काळात लग्न ठरणार आहे . त्याचबरोबर तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख देखील मिळणार आहे यावेळी नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे

कुंभ राशी – केतूचे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे . कारण केतू ग्रह तुमच्या नवव्या घरात प्रवेश करणार आहे , जो स्थानाला घर आणि विदेश प्रवासाचे स्थान मानले जाते. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.तसेच तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे .

तुम्ही व्यावसायिक प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळणार आहे . तसेच, ज्यांची वेतनवाढ थांबली आहे , त्यांना यावेळी बढती आणि वेतनवाढ मिळणार आहे . एकंदरीत केतू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध असणार आहे

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.