नमस्कार मंडळी.
दान करणे हि खूप चाली गोष्ट आहे पण अशा काही वस्तू आहेत कि ज्याचे दान आपण करू नये , त्याचा फटका आपल्यालाच बसतो.अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे दान केल्याने घरामध्ये कायमस्वरूपी गरिबी येईल , दुःख दरिद्रीने घर पूर्ण भरून जाईल आणि माता लक्ष्मी घर सोडून जाऊ शकते.
जीवनामध्ये अनेक चढ उत्तर येत असतात, काही चांगले तर काही वाईट क्षण असतात. कधी कधी तुमची आथिर्क परिस्थिती चांगली असताना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरातमध्ये गरिबी येते, काही घटना अशा घडतात कि आर्थिक बाजू पूर्ण ढासळून जाते.अशा वेळी अनेक प्रकारचे उपाय केले जातात.त्याचा फायदा पण होतो.
ज्यावेळी माणसाकडे पैसा धन संपत्ती चांगल्या प्रकारे असते सगळे अगदी व्यवस्थित असते तेव्हा ती व्यक्ती दान धर्म करतात , जेणेकरून पुण्य वाढते.शास्रानुसार दान धर्म केल्याने पुण्य मिळते आणि पुढच्या जन्मात अनेक प्रकारचे लाभ सुद्धा मिळतात.मात्र हे दान करताना काही गोष्टींची आपण विशेष काळजी घ्यायला पाहिजे.
अशा २ वस्तू आहेत ज्या घेतल्याने किंवा दान केल्याने पुण्य तर मिळत नाहीच मात्र त्याचे अनेक वाईट परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर पडू शकतात. पण नेहमी दान करताना काही गोष्टी लक्षात ठेवा कि दान करताना नेहमी स्वच्छ आणि निर्मल मनाने ते केले पाहिजे , त्यामध्ये कसलाच स्वार्थ नसावा. हे जे काही देवाने दिले आहे त्यातून थोडासा वाटा मी दान करत आहेत , माझे असे काहीच नाहीये असा निस्वार्थ ठेवून दान केले पाहिजे.
दान करून खूप मोठे काम केलाय किंवा दान केल्याने अहंकार आला नाही पाहिजे.शुद्ध भाव असला पाहिजे , दान केले आहे , गरजू लोकांना मदत केली आहे असा भाव मनामध्ये असुद्या.चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या २ गोष्टी ज्या दान केल्याने घरात गरिबी येते.
पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू , चुकूनही आपण झाडूचे दान करू नये.बऱ्याच वेळा आश्रमामध्ये , शाळांमध्ये किंवा अशा काही सार्वजनिक ठिकाणी लोक झाडूचे दान देतात. हे झाडूचे दान चुकूनही करू नका, झाडू म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचे रूप आहे , दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या वेळी ह्याच जादूची पूजा केली जाते. म्हणून झाडूचे दान दिले तर घरातली लक्ष्मी घरातून जाऊ शकते.
दुसरी गोष्ट म्हणजे स्टील किंवा प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तू – हि गोष्ट सहज तुम्ही कोणाला देत असाल तर सर्वात प्रथम ती बंद करा. बाकीचे इतर जे धातू आहेत जसे कि सोने . चांदी , पितळ ह्या पासून असलेल्या गोष्टींचे दान देऊ शकता पण स्टील आणि प्लास्टिक पासून जे बनेल त्याचे दान देऊ नका.
ह्या आहेत २ गोष्टी ज्यांचे चुकून हि दान करू नये. दान केल्याने घरामध्ये गरिबीचा वास सुरु होतो आणि गरिबी आणि दरिद्री दुःख मागे लागते