नमस्कार मंडळी,
चाणक्य मानतात कि या ६ प्रकारच्या लोकांना कधीच घरात येऊ नका. आज आपण अशा सभ्य समाजामध्ये राहत आहोत कि तिथे कोणालाही अडवता येत नाही. शेजारी, पाहुणे मित्र मंडळी सतत सहवास हवा असतो.
पण हे जे ६ लोक आहेत जर तुमच्या घरात आले तर ह्या लोकांचा जो वाईट प्रभाव आहे तो केवळ तुमच्या घरावर नव्हे तर घरातील प्रत्येक सदस्यावर अगदी लहान लहान मुलांवर सुद्धा त्याचा वाईट प्रभाव पडू शकतो.असे झाल्याने तुमची मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे या ६ लोकांना अजिबात घरात घेऊ नका..
पहिला प्रकार म्हणजे दुतोंडी लोक – म्हणजेच असे लोक जे तोंडावर गोड बोलतील आणि पाठीमागे तुमची निंदा करतील , तुमच्या बद्दल वाईट च वाईट बोलतील.असे लोक अत्यंत धोकादायक आणि हानी पोहचवणारे असतात.हे लोक कुटुंबामध्ये फूट सुद्धा पाडू शकतात.
दुसरा प्रकार म्हणजे चरित्रहीन व्यक्ती – जरी असे वाटत असेल कि ह्या लोकांपासून काही धोका नाहीये पण अप्रत्यक्षरीत्या हि लोक तुम्हाला मोठं नुकसान पोहचवू शकतात.या लोकांना समाजात अजिबात मान नसतो आणि म्हणून असे लोक जर तुमच्या घरी येऊ लागले तर तुमच्या कुटुंबाची सुद्धा प्रतिष्ठा समाजामध्ये खालावू लागते.
तिसरा प्रकार म्हणजे नीच लोक – नीच लोक म्हणजे असे लोक जे अविद्यावान आहेत. ज्यांनी विद्या ग्रहण केलेली नाही . ज्यांचे राहणीमान असे आहे कि समाजाला अनुरूप नाहीये . असे लोक जे समाजाच्या नियमांचे पालन करत नाहीत.असे लोक सुद्धा तुमच्या घरी येत कामा नये. अशा लोकांच्या घरी येण्याने त्यांचा नकारात्मक प्रभाव हा आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर होतो.
चौथा प्रकार म्हणजे दुष्ट व्यक्ती – अशा व्यक्ती दुष्ट काम करतात म्हणजे चोरी करतात , गुंडागर्दी करतात , कोणाला धमकावणे , घाबरवणे अशी कामे करतात. मानवी हितासाठी असे लोक अहितकारक असतात.म्हणून विशेष करून ह्या लोकांना तुमच्या मुलांपासून वेगळे ठेवा. ह्यांची सावली सुद्धा मुलांवर पाडू देऊ नका.
पाचवा प्रकार म्हणजे त्रास देणारी व्यक्ती – तुमच्या जवळपास अशा व्यक्ती असतातच कि ज्या तुम्हाला सतत त्रास देत असतात.तर या व्यक्तींना सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश देऊ नका.कारण तुमच्या सकट तुमच्या कुटुंबाला सुद्धा त्रास देऊ शकतात.
सहावी व्यक्ती म्हणजे आपल्या व्यंगावर बोट ठेवणारी व्यक्ती – या व्यक्तींची योग्यता काहीही नसते तरी सुद्धा या व्यक्ती अचूक बोट ठेवतात आणि त्यामुळे तुम्हाला राग येतो , मानसिक शांती भंग होते आणि कामांमध्ये सुद्धा मन लागत नाही या गोष्टीने त्रास होतो. ह्या लोकांना घरात सुद्धा प्रवेश देऊ नये.