नवरात्री मध्ये गुपचूप दान करा या ४ वस्तू , घरात नांदेल सुख शांती , पैसा कधीच कमी नाही पडणार..

नमस्कार मंडळी,

शारदीय नवरात्र चालू आहे , तुमच्या आजू बाजूच्या गरीब लोकांना या ४ पैकी कोणत्याही एका वस्तू चे दान तुम्ही अवश्य करा. तुमची जशी क्षमता आहे जसे सामर्थ्य आहे जशी कुवत आहे त्यानुसार तुम्ही दान धर्म नक्की करा.हिंदू धर्म शास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्व सांगितले गेले आहे ,

तुम्ही जी वस्तू दान करता ती हजारी पटींनी परतून पुन्हा तुम्हालाच प्राप्त होत असते आणि नवरात्री मध्ये केलेले दान हे देवीला प्रसन्न करते यामुळे जीवनातील सर्वात मोठ्या बाधा समस्या दूर होतात. घराची तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची भरभराट होते. जर तुम्ही लक्ष्मी दान केली म्हणजे पैसा दान केला तर लक्ष्मी हजारो पटींनी परतून तुमच्या कडे येते आणि तुमच्या घरात लक्ष्मी वाढत जाते.

चला तर जाणून घेऊयात कि या कोणत्या वस्तू आहेत कि ज्या दान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतील , देवीची कृपा होईल आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल. पहिले दान म्हणजे अन्नदान . हिंदू धर्म शास्त्रामध्ये अन्नदानास सर्व श्रेष्ठ दान असे म्हंटले आहे आणि म्हणूनच भूखेलेले लोग, जे गरीब आहेत, गरजू आहेत अशा लोकांना नवरात्री मध्ये अन्नदान केल्यास ७ जन्माची पाप धुवून निघतात.

पुढचा जन्म जर मानवाचा मिळणार असेल तर निर्धन कुटुंबामध्ये कधीच जन्म होत नाही. जीवनातील अनेक प्रकारची बाधा , कष्ट हि अन्नदानाने पूर्ण होतात. हा खूप साधा सोपा उपाय नक्की करा. दुसरे जे दान आहे ते आहे गूळ. जी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात , संपूर्ण काळात एकदा तरी नवरात्रीमध्ये एखाद्या गरीब व्यक्तीस दान करावे

एखाद्या विद्वान ब्राह्मणास गुळाचे दान करते त्या व्यक्तीला जीवनामध्ये गरिबीचा सामना कधीच करावा लागत नाही. जर घरात गरिबी असेल तर ती निघून जाते. हा उपाय केल्याने पैसा येत राहतो आणि जर घरामध्ये सतत वाद विवाद होत असतील , नकारात्मक शक्ती असतील तर त्या सुद्धा दूर होतात.

नवग्रहांची दोष नष्ट होतात. गुळाचे दान करून कुटुंबामध्ये प्रेम वाढण्यास मदत होते. नवरात्रीमध्ये गुळाचे दान नक्की करा. तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे वस्त्रदान म्हणजे कपड्यांचे दान. एखाद्या १० वर्षापेक्षा कमी असलेल्या कन्येला लाल रंगाच्या कपड्याचे दान केले तर ते खूप शुभ मानले जाते.अनेक प्रकारची पाप कर्म वस्त्रदान केल्याने कमी होतात.

आणि चौथी जी वस्तू आहे ते म्हणजे सुवर्ण दान. ज्या लोकांना जमेल त्यांनीच हे दान नक्की करा. एक तर सोन्याचे दान करावे किंवा चांदीचे दान करावे. अशी मान्यता आहे कि जी व्यक्ती सुवर्ण किंवा चांदीचे दान करते ती आपल्या पित्रूच्या आत्म्यास शांती प्रदान करते.हा उपाय केल्याने हे दान केल्याने पित्रूच्या आशीर्वादाने प्रगती साध्य होते अन कामात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. घरामध्ये सुख शांती लाभते .

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि तुमचे सामर्थ्य असेल तेवढेच दान करा आणि मुख्य म्हणजे दान धर्माची वाच्यता कुठेही करू नका. असे लोकांना दाखवण्यासाठी केलेल्या दानाचे पुण्य खूप कमी होते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *