Marathi Manus

Stay Up to Date With Us

अक्षय्य तृतीयेला राशीनुसार ‘या’ धातूंची खरेदी ठरेल लाभदायक; जाणून घ्या

नमस्कार मंडळी

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने, चांदीसारखे महागडे धातू खरेदी करण्याची परंपरा असून . अक्षय्य तृतीयेला धातूच्या रूपात देवी लक्ष्मीला आपल्या घरी आणले जात असते , जेणे करून या दिवशी मिळालेली संपत्ती, पुण्यफळ इत्यादी नष्ट होऊ नये.

यावर्षी अक्षय्य तृतीया मंगळवार, ३ मे रोजी साजरी होणार असून . या दिवशी प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार सोने, चांदी किंवा इतर दागिने खरेदी करायचे असतात. तथापि, अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या राशीनुसार धातू खरेदी करू शकता,

जे तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे . जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राशीनुसार कोणते धातू खरेदी करणे फायदेशीर ठरणार आहे .

मेष राशी : मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांबे किंवा सोने खरेदी करणे शुभ असणार आहे . तुमच्या राशीचा स्वामी मंगळ ग्रहासाठी तांबे शुभ धातू असणार आहे

वृषभ राशी : या राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे. अक्षय्य तृतीयेला चांदी खरेदी करणे या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे . हिरा हे शुक्राचे मुख्य रत्न मानले जात आहे .

मिथुन राशी : मिथुन राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह बुध आहे. यामुळे अक्षय्य तृतीयेला मिथुन राशीचे लोक पितळेची भांडी किंवा दागिने खरेदी करा

कर्क राशी : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कर्क राशीच्या लोकांनी चांदीची खरेदी करणे चांगले असणार आहे . या राशीचा अधिपती ग्रह चंद्र असून , त्यामुळे चांदी तुमच्यासाठी शुभ असणार आहे .

सिंह राशी : सिंह राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला तांबे किंवा सोने खरेदी करा . तथापि तांब्याची खरेदी जास्त उत्तम ठरणार आहे

कन्या राशी : कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेला कांस्य खरेदी करणे देखील शुभ राहील.

तूळ राशी : तूळ राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला चांदीची खरेदी करा . या राशीचा शासक ग्रह शुक्र आहे.

वृश्चिक राशी : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तांबे खरेदी करणे चांगले असणार आहे . या राशीचा स्वामी मंगळ ग्रहाचा शुभ धातू तांबे आहे.

धनु राशी : धनु राशीचा शासक ग्रह गुरु आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी पितळ किंवा सोने खरेदी करणे चांगले असणार आहे .

मकर राशी : अक्षय्य तृतीयेला मकर राशीच्या लोकांनी स्टील किंवा लोखंडी भांडी खरेदी करणे चांगले असणार कारण या राशीचा अधिपती शनिदेव आहे.

कुंभ राशी : या राशीच्या लोकांनी देखील मकर राशीप्रमाणे स्टील किंवा लोखंडी भांडी खरेदी करा . कारण या राशीचा अधिपतीही शनिदेव आहे.

मीन राशी : या राशीचा अधिपती ग्रह गुरु आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मीन राशीच्या लोकांसाठी पितळ खरेदी करणे शुभ असेल . त्यांना हवे असल्यास ते सोनेही खरेदी करू शकतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.