नमस्कार मंडळी,
४ फेब्रुवारी शुक्रवार चा दिवस आणि या दिवशी आलेली आहे गणेश जयंती , दर वर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीस गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी तुम्ही भगवान श्री गणेशांची मनोभावे पूजा करा.व्रत उपवास करा.भगवान श्री गणेशांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या त्यांना अर्पण करा.गणपती बाप्पा या मुळे खूप लवकर प्रसन्न होतात.
तुमच्या जीवनातील दुःख , अडचणी आणि समस्या दूर करतात.काही संकटे आहेत , एखादी मोठी बाधा आहेत हे सर्व असून सुद्धा गणपती बाप्पा व्यवस्तिथ बाहेर काढतात.गणपत बापा सुख समृद्धी आणि सौभाग्य आणि सफलता प्रदान करणारी देवता आहे.चला तर जाणून घेऊयात त्यांची कृपा होण्यासाठी कोण कोणते उपाय करू शकतो .
गणेश जयंतीस गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून भोग म्हणून मोदक नक्की अर्पण करा. मोदक हे श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहेत. जी व्यक्ती गणपती बाप्पांना मोदक अर्पण करते त्या व्यक्तीवर बाप्पा लवकर प्रसन्न होतात.तिच्या मनातील सर्व इच्छांची पुर्तता करतात.मोदकांसोबतच तुम्ही गणपती बाप्पांना सोबतच २१ दुर्वा सुद्धा अर्पण करू शकता .
जेव्हा गणपती बाप्पांच्या पोटामध्ये आग पडली होती तेव्हा त्यांच्या मातेने म्हणजे माता पार्वती ने त्यांना दुर्वा दिल्या होत्या. म्हणूनच त्यांना दुर्वा ह्या अत्यंत प्रिय आहे. जी व्यक्ती श्री गणेशांना २१ दुर्वा अर्पण करते , गणपती बाप्पा त्या व्यक्तीच्या जीवनातून संकटे आणि समस्या काढून टाकतात.
या गणेश जयंतीस तुम्ही गणेश चालीसा चा जर पाठ केला करून आरती केली तर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन अशा व्यक्तीच्या जीवनात सुख संपत्ती आणि सौभाग्य निर्माण करतात. जर तुमच्या वर किंवा तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट आलेले आहे किंवा कोणते संकट येणार आहे ज्यातून खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अशा वेळी या संकटातून मुक्ती मिळण्यासाठी या गणेश जयंतीस तुम्ही गणेश कवचाचा पाठ करा.गणेश कवच याचा पाठ केल्यास मोठी मोठी संकटे दूर होतात.ज्या प्रकारे तुम्ही देवी देवतांची पूजा करतो त्याच प्रकारे त्यांची जी वाहने असतात त्या वाहनांची सुद्धा पूजा केली तर त्यातूनही खूप शुभ आणि पुण्य फळांची प्राप्ती होत असते.
गणपती बाप्पांची दोन वाहने आहेत एक म्हणजे गजराज हत्ती आणि दुसरा म्हणजे मूषक , उंदीर . या दोन्ही प्राण्यांना तुम्ही थोडेफार अन्न वैगरे देऊ शकता. भगवान श्री गणेश हे मातृ पितृ भक्त आहेत आणि म्हणून ह्या गणेश जयंतीस तुम्ही जर शिव परिवाराची पूजा केली , शिव परिवार म्हणजे गणपती बाप्पाचे पिता माता असा हा तिघांचा एकत्र असणाऱ्या फोटोची जर तुम्ही पूजा केली
तर कुटुंबामध्ये कधीही वाद विवाद होत नाही.कुटुंबीयांमध्ये प्रेम भावना वाढीस लागते आणि त्यांच्या मनातील कुटुंबियांच्या मनोकामना सुद्धा नक्की पूर्ण होतात. जर तुम्हाला मोदक अर्पण करणे शक्य नसेल तर कमीत कमी गूळ तरी तुम्ही नक्की अर्पण करा. धार्मिक मान्यता अशी आहे कि गणपती बाप्पा ला थोडे अक्षदा म्हणजे तांदूळ , न तुटलेले तांदूळ आणि दुर्वा जर अर्पण केल्या
तर या २ वस्तुंनी सुद्धा गणपती बाप्पांची पूजा समृद्ध होते.ज्योतिष शास्त्रामध्ये दान धर्माचे मोठे महत्व सांगितले आहे.या गणेश जयंतीस तुम्ही गोर गरिबास किंवा गरजूना कपडे , भोजन म्हणजे जेवण धान्य इत्यादी वस्तूंचे दान करा. जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार आहात तर मंदिरात श्री गणेशांची पूजा केल्या नंतर त्यांचे दर्शन घेतल्यांनंतर त्या ठिकाणी हे कोणी गोर गरीब असतील
त्यांना या वस्तूंचे दान नक्की करा. या गणेशजयंतीस तुम्ही गणेश यंत्राची सुद्धा स्थापना करू शकता.ते अत्यंत शुभ मानण्यात आलेले आहे. आणि त्यामुळे घरात सुख समृद्धीचे आगमन होत.श्री गणेश यंत्र तुम्ही नक्की स्थापित करा.या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर शुद्ध पाण्याने जर अभिषेक केला आणि गणपती अथर्व शिष्याचा पाठ केला तसेच माव्याच्या लाडवाचा जर भोग लावला असता
आणि भक्तांमध्ये हे लाडू वाटले तर त्यामुळे सुद्धा गणपती बापा प्रसन्न होतात. ज्यांच्या घरात गरिबी आहे , दरिद्री आहे त्यांनी या दिवशी गणपती बाप्पा ला नैवेद्य म्हणून शुद्ध तूप आणि गूळ म्हणून नक्की अर्पण करा. तसेच गायीला गूळ आणि त्यावर थोडेसे तूप नक्की खाऊ घाला यामुळे धन संबंधी समस्यांचे निदान होते.म्हणजेच पैशासंबंधी ज्या काही समस्या आहेत त्या सर्व निघून जातात.
जे लोक नोकरी करतात आणि नोकरी मध्ये प्रोमोशन होत नाहीये अशा लोकांनी गणपती बाप्पाना साबूत ५ हळकुंड अर्पण करावीत , हे अर्पण करताना श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा नेहमी जाप करावा. या दिवशी तुम्हाला जमेल तेवढे जास्तीत जास्त वेळा गणपती बाप्पांच्या मंत्रांचा जाप करावा. अगदी मनोभावे त्यांची आराधना केली तर नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
गणपती बाप्पा मोरया.