१४ डिसेंबर मंगळवार मोक्षदा एकादशी , पैशांची तंगी , घरात अशांती , समस्या यासाठी नक्की करा हे साधे उपाय..

नमस्कार मंडळी,

१४ डिसेंबर मंगळवार चा दिवस आणि या दिवशी आलेली असून मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीस मोक्षदा एकादशी असे म्हंटले जाते. याच दिवशी गीता जयंती सुद्धा आहे.एकादशीचे व्रत हे भगवान श्री हरी श्री विष्णूंचे खूप प्रिय व्रत आहे. हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्त होते.

सोबतच तुमचे जे पूर्वज आहे अशा लोकांना सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते आणि म्हणूनच एकादशीचे व्रत हे अवश्य करावे. या वर्षी आलेल्या मोक्षदा एकादशी तिथीस सर्वार्थ सिद्धी योग आणि सोबतच अमृत सिद्धी योग हे अत्यंत दुर्मिळ योग जुळून आलेले आहेत.या दिवशी तुम्ही विधिवत श्री हरी श्री विष्णूंची पूजा नक्की करा.

आज असे काही छोटे छोटे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या अडचणी आणि समस्या नक्की दूर होतील.जीवनामध्ये दुःख दूर होऊन सुखाची प्राप्ती होईल आणि घराची , कुटुंबाची आर्थिक स्तिथी सुद्धा सुधारेल. मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णूंची विधिवत पूजा करा त्यांच्या पूजेमध्ये स्वतः पिवळ्या रंगाची कपडे घालावीत.

भगवान श्री हरी विष्णूंना पिवळा रंग अत्याधिक प्रिय आहे आणि म्हणूनच पिवळ्या रंगाची फुले किंवा फळे असतील किंवा धान्य असेल हे त्यांच्या पूजेमध्ये नक्की समर्पित करा , नंतर हे सर्व गोर गरीबांमध्ये दान करा.या दिवशी पूजा केल्यांनतर या मोक्षदा एकादशीची व्रत कथा नक्की ऐकावी.

व्रत कथा ऐकल्यानांतर तुमच्या मनातील इच्छा नक्की बोलून दाखवा. ती इच्छा भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने नक्की पूर्ण होईल. तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आणि प्रसाद म्हणून खीर अर्पण करावी. जेव्हा हि खीर अर्पण कराल तेव्हा दोन तुळशी पत्रे त्यावर ठेवायला विसरू नका.

जेणेकरून घरामध्ये सुख सौभाग्य लाभेल. ज्या लोकांची आर्थिक स्तिथी खूप कमजोर आहे किंवा खूप कर्ज आहे , घरात पैसा नाही अशा लोकांनी पिंपळाच्या वृक्षास जल अर्पण करा ,हे करत असताना ओम नमो भागवतेय वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप नक्की करा , कर्ज मुक्ती साठी आणि आर्थिक सुधारणेसाठी हा उपाय अत्यंत चांगला आहे.

या दिवशी जेवढे जास्त जमेल तेवढे तुम्ही गोर गरिबांना दान करा. शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान तुम्ही करा आणि गोर गरिबांचे आशीर्वाद प्राप्त करावे. या दिवशी ओम नमो भागवतेय वासुदेवाय नमः या मंत्राचा १०८ वेळ जाप करावा. जमत असेल तर विष्णू चालिसाचे या दिवशी श्रवण करा किंवा पाठ करा.

ज्यांच्या घरामध्ये पैसा येत नाही , गरिबी आहे अशा लोकांनी भगवान श्री हरी विष्णूसोबतच माता लक्ष्मीची पूजा करा हि पूजा घराची आर्थिक भरभराट घडून आणते. मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा , सोबतच या दिवशी तुळशीला ११ प्रदक्षिणा सुद्धा घाला.तुळस हि विष्णू प्रिय आहे .अशा प्रकारे केलेली तुळशीची पूजा सुख समृद्धी आणि शांतता प्रदान करते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *