२५ सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस १ दिवा नक्की लावा इथे, पैसा सुख भरभरून मिळेल

नमस्कार मंडळी

२५ सप्टेंबर २०२२ रविवारचा दिवस आणि या दिवशी सर्व पित्री अमावस्या आलेली आहे मित्रांनो सर्वपित्री अमावस्या म्हणजे पितृपक्षाचा श्राद्ध पक्षाचा अंतिम दिवस या दिवशी आपले पितर पितृलोकातून या धरतीलोकी आले होते पितृ म्हणजे काय तर आपल्या घरातील ज्या लोकांचा मृत्यू झालेला असतो जे लोक आज आपल्यात नाहीत अशांना आपण आपले पितर समजतो आणि हे पितर पितृपक्षामध्ये पितृ लोकातून भूलोकी येतात आपल्या घरी येतात

आणि आपण त्यांची आठवण काढतो की नाही त्यांचा स्मरण करतो की नाही हे पाहतात जर या पंधरा दिवसांच्या कालावधीत आपण आपल्या पितर स्मरण केलेले नसेल त्यांचं श्राद्ध घातलेलं नसेल तर्पण केलेलं नसेल तर आजच्या दिवशी कमीत कमी हा एक छोटासा उपाय आपण आवर्जून करा कारण हा अंतिम दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी पितर ही भूलोकांवरून पुन्हा स्वगृही म्हणजे पितृ लोकात जाणार आहेत

आणि आपल्या पितरांच्या आत्म्यास जोपर्यंत शांती लाभत नाही त्यांना जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत त्यांना पितृ लोकातून पुढे जाता येत नाही आणि म्हणून आपल्या पितरांच्या कल्याण व्हावं त्यांना मोक्ष मिळावा मुक्ती मिळावी यासाठी हा एक छोटासा उपाय आपण नक्की करा या उपायाने आपले पितर प्रसन्न होतात आणि पितरांच्या कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो त्यांच्या कृपाशीर्वादाने आपली आपल्या वास्तूची आपल्या घराण्याची उन्नती आणि भरभराट होत असते म्हणून जाणून घेऊया की हा उपाय आपण नक्की कधी करावा

२५ सप्टेंबर २०२२ रविवारच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या आलेली आहे वर्षभरात ज्या १२ अमावस्या येतात त्यापैकी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे कारण या अमावस्येस पितरांच्य प्रसन्न करण्यासाठीची ही सर्वात मोठी तिथी असते या दिवशी प्रदोषकाली प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो तर सूर्य मावळण्यापूर्वीचा अर्धा तास आणि सूर्य मावळल्या नंतरचा अर्धा तासअगदी थोडक्यात लक्ष ठेवायची गोष्ट अशी आहे की सूर्यास्तापूर्वीचा अर्धा ते एक तास आणि सूर्यास्तानंतरचा अर्धा ते एक तास या प्रदोष काळामध्ये आपण हा उपाय करायचा आहे

उपाय करण्यासाठी आपण कोणताही एक दिवा घ्यावा कोणताही मातीचा घेऊ शकता कणकीचा बनवतो त्या कणकेचा दिवा बनवू शकता किंवा अगदी एकदा धातूचा असेल तरीही चालेल तर असा एक दिवा आपण घ्यायचा आहे त्यामध्ये रुईची म्हणजेच कापसाची वात लावायची आहे हा दिवा तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे जल स्त्रोत आहे जल स्त्रोत म्हणजे काय तर नदी असेल ओढा असेल तलाव असेल विहीर असेल आड असेल ज्या ठिकाणाहून आपण पाणी आहे

तर अशा जल स्त्रोताजवळ फक्त एक तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे आपण तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता तेलासाठी शक्यतो तिळाचे तेल वापराव तिळाचं नसेल तर मोहरीचा वापरा मोहरीला सरसोंकातील असं म्हणतात आणि तेही नसेल तर अगदी कोणतेही तेल वापरलं तरीही चालेल फक्त मनोभावे मनामध्ये पूर्ण भाव ठेवून आपल्या पितरांचे स्मरण करत एक दिवा आपण या नदी तलाव किंवा विहिरीजवळ लावायचा आहे

असा जल स्त्रोत तुमच्याजवळ नसेल तर आपण कोणत्याही पिंपळाच्या वृक्षाखाली कोणत्याही बेल पत्राच्या झाडाखाली किंवा एखाद्या वडाच्या झाडाखाली हा दिवा प्रदोष काळामध्ये लावू शकता हा दिवा लावताना या दिव्याची वात दक्षिण दिशेकडे राहील याची मात्र काळजी घ्या कारण दक्षिण ही पितृ लोकांची दिशा आहे पितर या दिशेला वास करतात हा दिवा लावल्यानंतर आपण मनोभावे हात जोडायचे आहेत आणि आपल्या पितरांना मोक्ष मिळावा आपल्या पितरांना शांती लाभावी यासाठी मनोभावे पितृ देवतेकडे म्हणजे भगवान श्री विष्णूकडे प्रार्थना करायची आहे

सोबतच आपल्या पितरांना सुद्धा आपण प्रार्थना करा आपल्या हातून जे काही कळत नकळत अपराध घडले असतील या अपराधांची क्षम आपण पितारांकडे मागा अनेकांना कदाचित या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही मात्र पितर त्यांच्या लोकातून या धरती लोकांवर आलेले असतात ते या शेवटच्या दिवशी जाताना भगवान शिव शंकरांचे भोलेनाथांचे दर्शन घेतात

आणि प्रदोष काळी जल स्त्रोताजवळ जाऊन त्या ठिकाणी जलग्रहण करतात पाणी पितात आणि त्यानंतरच ते पितृ लोकी जात असतात आणि म्हणूनच पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची यावर्षीची अंतिम संधी आपण कृपया सोडू नका पितरांचे कृपाशीर्वादाने आपल्या घरात संतती संपत्ती सुख शांती समाधान लाभो या मनोकामनेसह आम्ही थांबत आहोत

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *