खजूर खाण्याचे फायदे; रोज फक्त २ खजूर खा, तब्येतीच्या तक्रारी दूर होतील

नमस्कार मंडळी

निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्वच असल्याच सांगितलं जात . २ खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका कमी होतो असतो खजूरातील पोषक गुणधर्मांमुळे खजुराला वंडर फूड असं बोलतात .आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग केला जातो.

निरोगी त्वचा आणि सुंदर केसांसाठी खजूर खाणं फायदेशीर आहे केवळ थंडीतच नाही तर एरवीही खजूर खाण्याला आरोग्य मूल्य आहे. खजुरातील पोषक घटकांमुळे खजुराला ‘वडंर फूड’ असं बोल जात . निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. २ खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होऊन , गंभीर आजारांचा धोका कमी होत असतो

रोज खजूर खाल्ल्यास..

१ . खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळत असते . १०० ग्रॅम खजूर खाऊन २७७ कॅलरीज मिळता असतात . खजूरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं असतात

२ . खजुरात असलेल्या फायबरचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यास मदत होते . खजूर खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही. पोट भरपूर वेळ भरलेलं राहते . वजन आटोक्यात ठेवण्यास पण खजुराचा उपयोग केला जातो .

३ . खजुरातील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होतं असते . सुकामेव्यात खजुरात सर्वात जास्त ॲण्टिऑक्सिडण्टस असते . खजुरात असलेल्या फ्लेवोनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होत असतो . खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासाठी खुप फायदेशीर असतो

४ . गरोदरपणात नैसर्गिक प्र्सूती होण्यासाठी खजुर खाण्याचा फायदा होईल . तसेच प्रसूती काळातल्या वेदनांमुळे आलेला अशक्तपणाही खजुराचा आहारात समावेश केल्यानं दूर होत असतो

५ . खजुरात फ्रक्टोज ही साखर असते. साखर न वापरता पदार्थांमध्ये गोडवा येण्यासाठी खजुराचा वापर आरोग्यदायी ठरतो. आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग केल्यानं वजनही आटोक्यात राहातं असते .खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होत असतो. म्हणजे खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. साखर नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.

६ . खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फाॅस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होत असतो . हाडं मजबूत ठेवण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. खजूर नियमित खाल्याने हाडांच्या विकाराचा धोका टळतो

7. खजुरातील क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहाण्यास मदत होतं असते आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास खजुराचा उपयोग केला जातो .

८ . खजुरात लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढते . रोजच्या आहारात खजूर असल्यास ॲनेमियाचा धोका टाळा जातो

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *