नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते त्यापैकी फाल्गुन अमावस्या ही पूर्वजांना समर्पित असते पूर्वजांसाठी केली जाणारी कार्य अमावस्येला केली जातात त्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यावरही चांगला परिणाम होतो तसेच जर तुमच्या घरांमध्ये पितृदोष असेल ज्याच्यामुळे तुम्हाला अनेक दिवसांपासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल
तर त्यावर उपाय करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम मानली जाते २ मार्च ला फाल्गुन अमावस्या आहे चला तर मग जाणून घेऊया पितृदोष का होतो तो केव्हा होतो आणि तेव्हापासून मुक्ती साठी काय करावे ज्योतिष शास्त्रानुसार पितृदोषाचे अनेक कारणे असतात जसे की आपल्या कुटुंबातील सदस्यांची योग्य अंतिम संस्कार झालेले नसेल किंवा श्राद्ध झालेलं असेल अकाली मृत्यू इतरांचा अपमान करणे
धार्मिक कार्यात पितरांचे स्मरण न करणे सदाचारी वागणं नसणे पिंपळ कडूलिंब तोडणे किंवा वटवृक्ष तोडणे सापाला मारणे या कारणांमुळे पितृदोष होऊ शकतात पितृदोष हा व्यक्तीची कुंडली पाहून ओळखला जातो रवी आणि राहूचा संयोग जन्म कुंडलीत नवव्या भावात असतो तेव्हा पितृदोष तयार होतो पितृदोषआला ज्योतिषशास्त्रात अत्यंत वाईट मानलं जातं पितृदोष त्रासलेल्या कुटुंबात कधीच शांती नसते
पितृदोष यामुळे माणसाला प्रत्येक पायरीवर संकटांचा सामना करावा लागतो त्यांच्या घरावरती आर्थिक संकट येतात कष्ट करूनही त्याचं फळ मिळत नाही लग्नात अडथळे येतात अपत्या संबंधी चा आनंद सहजासहजी मिळत नाही गर्भपात किंवा गर्भधारणेत खूप त्रास होतो करियर मध्ये वारंवार खंड पडतो आणि म्हणूनच पितृदोषाचे वेळेस निवारण करणे आवश्यक असते पितृ दोष असल्यास काय उपाय करावे
अमावस्याच्या दिवशी गरीब व्यक्तीला अन्नदान करावे अमावसेला एक पिंपळाचे झाड लावा आणि त्या झाडाची सेवा करा अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध दान करा त्यामुळे पित्र समाधानी होतात भगवत गीतेचे वाचन करा संपूर्ण गीता वाचणे शक्य नसेल तर सातवा अध्याय आवश्य वाचा त्यामुळे तुमच्या पूर्वजांचा दुःख कमी होईल आणि त्यांची नाराजी दूर होते तसेच गायत्री मंत्राचा नियमित जप करा त्यामुळेसुद्धा पितृदोषाचे निवारण होते
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद