नमस्कार मंडळी,
ज्योतिष शास्त्र मध्ये शनी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह विशेष महत्त्वाचे मानले जातात. शनीच्या अशुभ स्थितीमुळे मानसिक-शारीरिक आणि आर्थिक त्रास होतो. तर मंगळाचा अशुभ स्थितीमुळे व्यक्तीचे वैवाहिक जीवनात उपस्थित होते. या महिन्याची म्हणजेच मे २०२२ ची सुरुवात शनि आणि मंगळाच्या संयोग आणे होत आहे ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे.
हे दोन्ही ग्रह कुंभ राशी मध्ये आहेत. त्यामुळे तीन राशीच्या लोकांना त्रास सहन करावा लागू शकतो. पुढचे पंधरा दिवस त्या लोकांसाठी खूप काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत या तीन राशी चला जाणून घेऊया. शनि आणि मंगळ हे केवळ प्रबळ ग्रह नाही तर ते एकमेकांचे शत्रू ही आहेत.
अशा परिस्थितीमध्ये हे दोन्ही ग्रह एकाच राशीत असल्यामुळे त्यांच्या द्वंद्वयुद्धाचे परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच त्यांच्या संयोग ला दुहेरी योग असे म्हणतात. या योगाचा तीन राशींवर वाईट परिणाम होईल. या काळात या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुम्हाला घाबरवणे असा अजिबात हेतू नाही.
परंतु पुढे खड्डा आहे हे माहिती असून त्याबद्दल सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे.तसेच आपण उपायही जाणून घेणार आहोत. मंगळवारी आणि शनिवारी हनुमान ची पुजा आणि शनिवारी शनी देवांची पूजा तसंच मंत्रजप करावा. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत त्या तीन राशी. पहिला रास आहे.कर्क
कर्क राशी: कर्क राशीच्या लोकांसाठी शनी मंगळाचा योग शुभ नाही. त्यांच्यासोबत काही आर्थिक दुर्घटना घडण्याची संख्येत आहेत. तुम्ही जखमांना बळी पडू शकता. मुक्का मार लागण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणताही धोका न पत्करता संयमाने काम करा.
कन्या राशी: कन्या राशीच्या लोकांसाठी शनी मंगळाचा या दुहेरी योगाचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पोष्टिक पदार्थ खाण्यास जास्त जोर द्यायला हवं. एवढा महिना बाहेरचं खाणं टाळा थकवा सुद्धा वाढू शकतो त्यामुळे योग आणि प्राणायाम करा.
कुंभ राशी : कुंभ राशीत शनि आणि मंगळ यांची युती होत असल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वात अडचणीचा ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी आवेशात येणे कडू बोलणे गर्विष्ठपणा यासारख्या गोष्टी टाळाव्या. अन्यथा त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी काळजी घ्यावी चुकूनही कोणाला काही बोलू नये.
आणि कुठल्याही वादात पडू नये. सुरुवातीला म्हटलं तसं तुम्ही हनुमानाची उपासना करा. तसच शनि देवाची पूजा आणि उपासना ही तुम्ही करू शकता. तुमची कुलदैवता किंवा इष्टदेवता यांची जी काही उपासना आहे. जी तुम्ही करत असाल ती चालू ठेवा त्यात खंड पडू देऊ नका. कुलदैवत आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढत.
त्यामुळे हे पंधरा दिवस जरा संयम ठेवा साधना उपासना करा. म्हणजे तुमच्यासाठी हा पंधरा दिवसांचा काळ सुखकारक होईल.
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.