दिवाळीला वास्तुशास्त्रा नुसार निवडा घरच्या भिंतीना हे रंग सर्व चागले होईल

नमस्कार मंडळी ,

आपल्या दैनंदिन जीवनात वास्तुशास्त्रानुसार फार महत्वाचे आहे जर आपले घर वास्तुशास्त्रा प्रमाणे बनवले असेल तर आपल्या जीवनावर त्यांचा खुप सकारात्मक परिणाम दिसून येईल रंगाचाही आपल्या जीवनावर खुप प्रभाव पडतो जर घरामध्ये वास्तुशास्रा प्रमाणे योग्य रंगाचा वापर केला गेला तर आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आपल्या जीवनावर या रंगाचा खुप सकारात्मक परिणाम होतो

घराला रंग काम करतानाही प्रत्येक खोलीचे एक वेगळे पण असते प्रत्येक खोली काही विशिष्ठी कार्यासाठी ठरवलेली असते म्हणूंन त्या प्रमाणेच रंग दिला गेला पाहिजे घराला रंग देण्या पूर्वी वास्तुशास्राचे काही नियम माहीत असणे आवश्यक आहे जर आपण घराला रंग काम करताना चुकीच्या रंगाच्या शेड दिल्या गेल्या तर आपल्या जीवणार या सर्वाचा वाईट परिणाम दिसून येतो

चुकीच्या रंगाच्या वापरामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी व संकटे निर्माण होतात म्हणून आपल्या जीवनात सुख समृद्धी व वैभव येण्यासाठी घराला कोणता रंग द्यावा कोणत्या खोलीला कोणत्या रंगाने सजवावे ते आता आपण जाणून घेऊया ड्रॉईंग रूम किंवा हॉल ड्रॉईंग रूम ही एक अशी जागा आहे जेथे घरतील सर्व सदस्यचा जास्तीत जास्त वेळ व्यतीत होतो बाहेर कोणी व्यक्ती घरात आल्यास सर्व प्रथम ड्रॉईंग रूम मधेच येते

आपल्या घरातील मुख्य बाबी विषयी चर्चा देवाण घेवाण हे सर्व ड्रॉईंग रूम मधेच होत म्हणूंन घरामध्ये ड्रॉईंग रूम ला जास्त महत्व असते वास्तुस्त्रानुसार ड्रॉईंग रूम ला पांढरा फिकट हिरवा गुलबी रंग देणे खुप शुभ असते हे रंग मानला थंडावा देणार असतात त्याशिवाय हे फ्रेश आणि फिकट रंग दिल्यावर खोली थोडी मोठी भासते या रंगामुळे आपल्या जीवनात शुभ आणि सकारात्मक परिणाम बघायला मिळतात

स्वयंपाक घर घरतील स्वयंपाक घर हे नेहमी घरातील आग्नेय कोणतं असावे स्वयपाक घराला नेहमी आग्नेशी संमधीत म्हणजे ऑरेंज किंवा अबोली हे रंग द्यावे किचन चा स्लॅब बनवण्यासाठी मार्बल कैवा सिरॅमिक च्या टाईल्स घ्यावी स्वयंपाक घरातील फरशी हलक्या पांढऱ्या किंवा हलक्या तपकिरी रंगाचे असते

बेडरूम – घरतील बेडरून हे घरातील पश्चिम दिशेला असने योग्य आहे बेडरूम चा रंग हा नेहमी थंड भावना निर्माण करणारा असावा इथे खुप भडक किंवा बटबटीत रंग वापरू नये बेडरूम मध्ये भडक व बटबटीत रंग असले तर मनात दुःखाची भावना निर्माण होते बेडरूम मध्ये पती पत्नी आपल्या सुखी जीवनासाठी गुलाबी स्वप्ने पहाहत असतात म्हणून बेडरूम ला गुलाबी रंगाने रंगवावे

देवघर आपल्या घरतील देवघर हे घरतील उत्तर पूर्व म्हणजेच घराच्या ईशान्य दिशेला असावे देवघरासाठी सर्वात शुभ रंग म्हणजे फिकट पिवळा रंग होय जर आपली इच्छा असेल आपण आपल्या देवघराला पांढरा रंग ही देऊ शकता हे दोन्ही ही रंग देवपूजेच्या वेळी आपले मन शांत व एकाग्रह ठेऊ शकतात

मुलांच्या खोलीचा रंग – या खोलीत मुलांचा जास्तीत जास्त वेळ व्यतीत होतो म्हणून मुलांच्य मनाशी निगडित रंग या खोलीला देणे गरजेचे आहे ही खोली आपल्या मुलांच्या अभ्यासाशी व प्रगतीही संमधीत आहे मुलांनी व्यवस्तीत अभ्यास करावा आणि त्यात त्यांना यश मिळावे अभ्यासात त्यांचे लक्ष एकाग्र व्हावे या साठी पांढरा फिकट हिरवा किंवा क्रीम रंगाने मुलांची खोली रंगव्हावी मित्रांनी वास्तुशास्रा प्रमाणे घराला कोणता रंग देणे योग्य आहे हे आता आपल्या लक्षात आलेच असेल

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *