नमस्कार मंडळी,
समोरच्याला आकर्षित करण्यासाठी , आपल्या व्यक्ती महत्वाचा प्रभाव पाडण्यासाठी , चार चौघात किंवा एखाद्या सभेमध्ये गेल्यांनतर उठून दिसण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय इतका प्रभावशाली आहे कि जिथे कुठे जाल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.तुमचे व्यक्ती महत्व एक अनन्य साधारण बनेल.या साठी तुम्हाला दोन लवंगा पाहिजे , लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ आहे .
प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला तो दिसून येईल.दोन लवंगा तुम्हाला घायच्या आहेत. तुम्ही हा उपाय तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर सुद्धा करू शकतात. उपाय करताना स्वच्छ स्नान करणे , स्वच्छ कपडे घालणे आवश्यक आहे.उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचे आहे. बसताना एखादे आसन नक्की घ्यावे किंवा पाटावरती बसा.
जर तुम्ही बाहेर असाल जिथे आसने नाहीये अशा वेळी आसने नसताना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या उजव्या हातात या २ लवंगा घेऊन बसायचे आहे, या लवंगा साबूत असाव्या म्हणजे न तुटलेल्या , न फुटलेल्या , पुढे एक फुल असावे अशा लवंगा पाहिजे. या तुमच्या उजव्या हातात उजव्या मुठीमध्ये बंद करायच्या आहेत.
मूठ घट्ट बंद करायची आहे आणि या लवंगांना तुम्हाला अभि मंत्रित करायचे आहे. अभि मंत्रित करताना डोळे बंद करून तुम्ही हा मंत्र जास्तीत जास्त वेळा बोलायचा आहे. २१ , ५१ किंवा १०८ वेळा किंवा त्याही पेक्षा जास्त. जितका जास्त वेळा तुम्ही ह्या मंत्राचा वापर करा. आणि याच लवंगांचा वापर करून तुम्ही आकर्षित बनणार आहे.
समोर एक व्यक्ती असुद्या किंवा एकापेक्षा जास्त असुद्या त्या व्यक्ती तुमच्या कडे आकर्षित होतील खरतर हा एक वशीकरणाचा तोटका आहे , उपाय आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान काही होत नाही. मंत्र लक्ष पूर्वक बघा- ॐ भूर्भुवः स्वः तत् सवितुर्वरेण्यं। भर्गोदेवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात् ओम ओम ओम , ओंकाराचा उच्चारण अगदी सावकास श्वास घेऊन तुम्हाला करायचे आहे.
जो मंत्र आहे हा गायत्री मंत्र आहे आणि ह्या गायत्री मंत्राला ३ ओंकाराचा संपुट लावलेले आहे. संपुट म्हणजे गायत्री सम्पल्यानांतर ३ वेळा ओमकार करायचा आहे. अगदी सावकाश दीर्घ श्वास घेऊन ह्या मंत्राचा जितका जास्त वेळा जाप कराल तितक्या जास्त अभिमंत्रित होतील आणि त्या नंतर या लवंगा सातत्याने स्वतः जवळ बाळगायच्या आहेत.
ज्या वेळी तुम्हाला कोणाला आकर्षित करायचे आहे , उठून दिसायचे असेल तेव्हा या २ लवंगा तोंडात टाका ,लोक तुमच्या कडे आकर्षित होऊ लागतील , तुमच्या व्यक्ती महत्वाचा ठसा नक्की उमटेल.या लवंगा तोंडात टाकल्यांनंतर पुन्हा त्याचा उपयोग करता येत नाही. पुन्हा तुम्ही नवीन लवंगा घेऊन अभिमंत्रित करू शकता.खूप प्राचीन उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा.