Marathi Manus

Stay Up to Date With Us

कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत.

नमस्कार मंडळी,

ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहांचा आपल्या जीवनावर प्रचंड प्रभाव पडतो सोबतच आठवड्यात जो वार असतो तो प्रत्येक ग्रहाची निगडित आहे जर आपण ज्या वारी त्याच्या ग्रहाशी संबंधित रंगाचे कपडे परिधान केले. आपलं भाग आपलं नशीब प्रबळ बनतं आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळते. सोबतच प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा मिळतं.

रंगांचे स्वतःचे सखोल विज्ञान आहे. कोणत्या दिवशी कोणते कपडे घालावेत आणि कोणते रंग टाळावेत याबद्दल जाणून घेऊया. आपण दररोज नीटनेटके कपडे परिधान करून घराबाहेर पडतो. कपडे परिधान करताना ड्रेस सेन्स आणि मॅचिंगची आपण विशेष काळजी घेतो. हे आपण चांगले दिसण्यासाठी करत असलो, तरीही कपड्याच्या रंगाचा आपल्या आयुष्याशी खूप घट्ट संबंध असतो.

आपल्या मनावर वेगवेगळ्या रंगांचा खूप खोलवर प्रभाव होतो. काही रंग थंडावा देतात तर काही रंग ऊर्जा वाढवतात. त्याचबरोबर काही रंग मनाला जड करतात, तर काही रंग मनाला आनंद देतात. रंगांचे स्वतःचे सखोल विज्ञान आहे.चला तर मग आपण जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणते कपडे घालावेत आणि कोणते रंग टाळावेत याबद्दल जाणून घेऊया.

सुरवात करू या सोमवार पासून सोमवार हा शिव शंकर यांचा तसंच सोमवार हा चंद्र देवाचा सुद्धा वार आहे. म्हणून च सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. या दिवशी काळे आणि चमकदार लाल रंगाचे कपडे टाळावेत. तसेच अतिशय हलक्या शेड्स घ्याव्यात.
मगंळवार चा दिवस हा मारुती राय यांचा मानला जातो

आणि हा मंगळवार हा मंगळ ग्रह शी सुद्धा संबंधित आहे आणि म्हणूनच आपण मंगळवारी तुम्ही लाल रंगसंगतीचे कपडे परिधान केले तर ते तुमच्यावर चांगले दिसतील. गुलाबी, लाल रंगाशी संबंधित कोणतीही शेड तुम्ही घालू शकता.हा लाल रंग आपला उत्साह वाढवेल लाल शेड व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या ड्रेसमध्ये क्रीम आणि फिकट पिवळा रंग देखील समाविष्ट करू शकता,

परंतु लक्षात ठेवा की या दिवशी चमकदार हिरवे कपडे घालू नका. बुधवार हा दिवस गणपती चा वार आहे गणपती बाप्पा चार वार आहे.आणि गणपती बाप्पा ला दूर्वा अतिशय प्रिय असतात.म्हणून या बुधवार घ्या दिवशी आपण हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत स्पोर्टी लूकमध्ये काही हिरवे कपडे घालता येतील. जर तुम्ही सकाळी खेळायला किंवा जॉगिंगला गेलात तर तुम्ही हिरवा ट्रॅक सूट घालावा.

काही जण ऑफिसमध्ये पिस्ता म्हणजे फिकट हिरवा रंग घालू शकतात. आपण त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये हलका राखाडी किंवा काळा रंग जोडू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काळा रंग फक्त पॅंट किंवा स्कर्टच्या रुपात परिधान केला पाहिजे. गुरूवारच्या दिवस श्री हरी श्रीविष्णू आणि साई बाबा श्री स्वामी समर्थ यांच्या वार आहे.

गुरुवारी तुम्ही तुमच्या ड्रेसमध्ये पिवळा रंग घालू शकता. पिवळा रंग हा या तिन्ही देवांना आवडता रंग आहे.तसे, आपण या दिवशी लाईट शेड्स देखील घालू शकता. क्रीम, पांढरे आणि गुलाबी रंगाचे कपडे त्यांच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये घालता येतात. गुरुवारी पारंपरिक पोशाख परिधान करण्याला प्राधान्य द्यावे.

शुक्रवारीचा दिवस माता लक्ष्मी चा वार आहे माता लक्ष्मी ही धना ची देवी आहे.या दिवशी माता लक्ष्मी ला प्रसन्न करणारा गुलाबी रंग चे कपडे घालावेत.तसेच पार्टीवेअर कपडे घालण्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे, कारण हा दिवस शुक्राचा आहे. काही चमकणारे कपडे घालावेत. राखाडी, काळा, निळा आणि हलका हिरवा अशा सर्व छटा रंगांमध्ये परिधान केले जाऊ शकतात.

या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. शानिवार हा शनि देवाचा वार आहे.शानिवारी काळ्या रंगाचे कपडे घालावेत.शनिवारी निळा, काळा, राखाडी आणि हिरवा रंग परिधान करू शकता. चौकोनी आणि पट्टेदार कपडे देखील परिधान केले जाऊ शकतात. परंतु या दिवशी लाल रंग परिधान करू नये आणि काळा आणि लाल रंगाचे मिश्रण नसावे हे देखील लक्षात ठेवा.

रविवार हा भगवान श्री सूर्यदेव यांचा वार आहे. सूर्यनारायण यांचा वार आहे.म्हाणून या दिवशी आपण सोनेरी रंगाचे कपडे परिधान करावेत सोबतच गुलाबी रंगांचे व केशरी रंगाचे कपडे परिधान करावेत. शुक्रवारी नवीन कपडे घालणे खूप शुभ आहे, याशिवाय बुधवार आणि गुरुवारी तुम्ही नवीन कपडे घालू शकता.

मंगळवार आणि रविवारी नवीन कपडे परिधान करू नयेत, तसेच या दिवशी नवीन कपड्यांची खरेदीही करू नये कारण नवीन कपडे ट्रायल रूममध्ये परिधान करावे लागतात.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.