शुक्र करणार राशी परिवर्तन २९ जानेवारी पासून या राशींच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार …

नमस्कार मंडळी,

२९ जानेवारी रोजी भौतिक सुख , वैवाहिक सुख,विलास , कीर्ती , प्रतिभा , सौन्दर्य इत्यादींचा कारक शुक्र ग्रह विक्री अवस्थेतून मार्गी होईल.शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे.आणि मीन हि शुक्राची उच्च राशी आहे तर कन्या हि शुक्राची नीच राशी मानली जाते.शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे काही राशींवर त्याचा अनुकूल परिणाम दिसून येणार आहे.

शुक्र शुभ असेल तेव्हा देवी मातेचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. उद्योग व्यापारात आर्थिक आवक वाढणार असून आर्थिक समस्या दूर होतील. नोकरीमध्ये बढतीचे योग जमून येतील. हा काळ या काही खास राशींसाठी प्रगतीचा काळ असणार आहे. अचानक धन लाभाचे संकेत आहेत. भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार

असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. कुटुंबामध्ये सतत होणारे वाद कमी होऊ सुखाचे दिवस येणार आहे. शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनात येणार असून या राशींचा भाग्योदय घडून येणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे-

मिथुन – शुक्र मार्गी झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे.या दरम्यान मान सन्मानात वृद्धी होईल तसाच कुटुंबियांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.या शिवाय तुमच्या जोडीदार सोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील.गोचर काळात तुमच्या समस्यांचे निरसन होईल.आरोग्याशी संबंधित समस्या सुद्धा कमी होतील आणि करिअर मध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

सिंह – शुक्राचे परिवर्तन हे तुमच्या साठी अनुकूल असणार आहे.या दरम्यान तुम्हाला जमीन , घर किंवा वाहन खरेदीचा सुद्धा योग संभवतो.जमिनीचा व्यवहार केल्यास त्याचा चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत.धार्मिक कामांमध्ये तुम्ही भाग घ्याल.जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला धन लाभ सुद्धा होऊ शकतो.वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल.

कन्या – शुक्राचा गोचर कन्या राशीसाठी सकारात्मक बदल घडून आणणार आहे.शुक्र मार्गस्थ झाल्याने तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण येईल.या दरम्यान भाऊ बहिणीचे नाते अधिक मजबूत होईल.येणाऱ्या समस्यांचा सामना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कराल. धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल.स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो.

धनु – हा काळ धनु राशीसाठी शुभ ठरू शकतो.या दरम्यान तुम्हाला गुप्त शत्रूंपासून मुक्ती मिळेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागतील आणि त्याचे फळ सुद्धा तुम्हाला चांगले मिळणार आहे.जोडीदाराच्या सोबत सुद्धा तुम्ही चांगला वेळ घालवाल.धन लाभाचे योग जुळून येत आहे. मित्र परिवार , कुटुंबातील सदस्यांची मदत मिळेल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *