नमस्कार मंडळी
श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू देत आहे म्हणून मी तुम्हाला आनंदात सुखात ठेवावे. आपल्या आयुष्यात कधीकधी अशा गोष्टी घडतात असे प्रसंग घडतात. त्यावेळी आपण पूर्णपणे खचून जातो. सोडून जातो पण अशा वेळेला आपण हार न मानता. आपण आपल्यावर व आपला देवावर विश्वास ठेवून खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे अशा वेळेला आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे.
अशा वेळेला आपण प्रेरणादायी गोष्टी सुद्धा ऐकल्या पाहिजेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये खूप वैचारिक सत्य आणि तथ्य आहे. आणि जीवनाचा आधार आहे. यामध्ये उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेस नारदमुनी वैकुंठधाम ला पोहोचले होते तेव्हा त्यांनी भगवान श्री विष्णूंना या सात संकेतां बद्दल विचारले होते.
तेव्हा श्री भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले होते कि भगवान विष्णू स्वतः त्यांच्या भक्तांना काही संकेत देतात. की जेणेकरून त्या येणार त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल समजू शकेल. आयुष्यात कधी सुखाच्या सूर्यप्रकाश असतो तर कधी दुःखाचे ढग पसरलेले असतात. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे चढ-उतार हे येतच असतात.
हे सर्व काळाच्या चक्रामुळे घडत असते. काळापेक्षा बलवान काहीही नाही. आणि प्रत्येकाला काळा समोर नतमस्तक व्हावे लागते. काळ हे एक असं शस्त्र आहे की त्याची जखम सर्वात वेगवान आहे. आणि काळाची जखम कोणीही भरून काढू शकत नाही. कारण वेळच वेळेचे चोख उत्तर देऊ शकते.
असे म्हणतात कारण निरंतर चालणारी एकच गोष्ट म्हणजे काळ आणि ती पण आजची वेगळी आणि उद्याची वेगळी म्हणजेच होत्याचं नव्हतं होईल आणि नव्हत्याचं होतं होईल. हे संकेत निसर्गाकडून प्राण्यांकडून शुभ किंवा अशुभ त्यांच्या भक्तांना ही मिळू शकतात. यासाठी माणसाला फक्त ते समजून घेणे आवश्यक आहे.
हेच ते साथ संकेत आहेत कि जे स्वतः भगवान श्रीविष्णु सांगितले आहे.चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत हे सात संकेत सकाळी जर तुम्ही एखाद्या कार्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना तुम्हाला जर गोमातेचे दर्शन झाली किंवा तुम्हाला ऋषी संत महाराज किंवा पुजारी यांचा आशीर्वाद मिळाला तर ते खुप शुभ लक्षण आहे असे मानले जाते.
तुम्ही ठरवलेले काम नक्कीच यशस्वी होणार आहे. भक्ती एखादी मुलाखात असेल नवीन संपत्ती खरेदी करण्याबाबत एखादी मीटिंग किंवा व्यवहार यात सफलता येईल. तुमच्या दारात किंवा अंगणात एखादी गाय वारंवार काही खायला येत असेल. तुमच्या घरात मांजर बाळांना जन्म देते. एखादे माकड तुमच्या घरातले अन्नपदार्थ घेऊन जाते.
किंवा पक्षी तुमच्या अंगणात तळ ठोकून किलबिलाट करत राहतात. असे काही शुभचिन्हे सूचित करतात की तुमचा येणार काळ तुम्हाला बलवान बनवेल. त्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यातील योग्य स्थानावर पोहोचणार आहात. आणि लवकरच यशाचे शिखर तुम्ही गाठणार आहात. जर ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे ४:२४ ते ५:१२ या वेळेत तुमचे डोळे उघडले आणि तुम्हाला देवाचे स्मरण झाले.
किंवा कोणीतरी तुम्हाला एखाद्या दिशेने घेऊन जात आहे असे दिसले.तर हे तुमच्यासाठी यशाचे दरवाजे खुले करणार आहे. असे समजून घ्यावे. तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल योग्य मत मिळणार आहे. यावर देव स्वतः तुम्हाला साथ देणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कधीकधी तुमचे मन विनाकारण आनंदी राहते.
तुमचा चेहरा नेहमी फुललेला राहतो आणि हास्याने भरलेला राहतो. तुम्ही रागाच्या पलीकडे जा हे चिन्ह तुम्हाला तुम्हाला दाखवते कि आनंद तुमच्या आयुष्यात ठोठावत आहे. जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहाल. अशावेळी आपण ज्या गोष्टीचा विचारही करत नाही अशा गोष्टी अशा बातम्या आपल्याला मिळत राहतात.
देव स्वतः लहान मुलांमध्ये वास करतो. एखादी लहान मुलगी किंवा मुलगा तुमच्याकडे वारंवार बघून हसत असेल किंवा तुमच्या घरी येत असेल. तुमचा अंगणात आनंदाने खेळत असेल तर हा देखील आपल्यासाठी खूप चांगला शुभ संकेत आहे. अशी चिन्हे सूचित करतात की तुमचे जीवन हसत आणि नवीन आनंदाने भरले जाणार आहे.
आणि तुमच्या आयुष्यात काही नवीन नाती जोडली जाणार आहेत. समजुन जा की भगवंताच्या कृपेने असे संकेत मिळत आहेत. तुम्हाला आनंदी आणि समाधानी जीवन लाभणार आहे. अनेक दिवसापासून चालत आलेले तुमचे खर्च अचानक टळतात आणि पैशाचे नवे स्त्रोत्र उघडू लागतात. मग या लक्षणावरून समजून घ्या की तुमचा वाईट काळ संपणार आहे.
आणि पैसा आता तुमच्या घरात नक्कीच राहणार आहे. तुमच्या घरी माता लक्ष्मीचा वास होणार आहे. पूजेच्या ताटात असलेली फुलं चंदन देवाची मूर्ती तुमच्या कडे पाहून हसत असेल असा भास होत असेल. घरात प्रिय पाहुण्यांचं आगमन घरात सोना चांदी किंवा स्त्री च्या डाव्या व पुरुषांचा उजव्या अंगाला मुरगळण अतिशय शुभ मानला जात.
ही सर्व चिन्हे तुमच्या येणाऱ्या शुभ काळा ची माहिती देतात. त्यामुळे येणाऱ्या सर्व क्षणांना आनंदाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करा श्री स्वामी समर्थ
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.