नमस्कार मंडळी
या महिन्यात निष्काळजीपणा करणे तूळ राशींतील लोकांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे . स्पर्धेला जाणाऱ्यांनी संयम बाळगणं गरजेचं आहे, फार दडपण येण्याची शक्यता आहे . जास्त ताण घेतल्याने गोष्टी आणखी वाईट होण्याची शक्यता आहे वर्तमान जेवढी परिश्रम घ्याल, तितकं तुम्हाला यश मिळेल.
महिन्याच्या मध्यात म्हणजे १६ तारखेपासून तुम्हाला अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. या काळात तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. वरिष्ठांचा सहवास मिळण्याची शक्यता आहे . काही छोट्या-मोठ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करण्याची गरज असणार आहे . कदाचित महिन्याच्या शेवटी तुम्हाला थोड्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता.
एप्रिल महिन्यात नोकरदारांना आव्हानांना खंबीरपणे सामोरे जावा लागणार आहे , अन्यथा तुमच्यासमोर येणारी समस्या तुम्हाला विनाकारण त्रास देऊ शकाल . नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित आर्थिक बळ मिळण्याबाबत साशंकता आहे. व्यावसायिकांना बाजारातील स्पर्धेमुळं नुकसान पोहचण्याची शक्यता आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स द्याव्या लागणार आहे . सोन्या-चांदीच्या व्यवसाय करणाऱ्यांनी उधारीत माल विकू नये. औषधी व्यवसायाला या वेळी अपेक्षेइतका नफा मिळू शकणार नाही. ज्यांची परीक्षा सुरू आहे किंवा येणार आहे, अशा विद्यार्थ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असण्याची शक्यता आहे .
तूळ राशींतील लोकांना आरोग्यबाबत अधिक काळजी घेण्याची गरज भासणार नाही . परंतु, काम करताना पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे किंवा कंबरेच्या खालच्या भागात समस्यांना सामोरे जावे लागणार आहे . आमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांनी सावधानीचा इशारा असणार आहे .
या महिन्याच्या १७ तारखेनंतर गंभीर आजार जडण्याची शक्यता आहे. लहान मुलांना गरम वस्तूंपासून दूर ठेवा. इलेक्ट्रिकल काम करताना काळजी घ्यावी लागणार आहे शेजाऱ्यांशी संबंध दृढ होणार आहे तुम्हाला तुमच्या बाजूने सर्वांशी प्रेमानं वागावं लागणार आहे . महिन्याच्या शेवटच्या १० दिवस धार्मिक स्थळाची यात्रा शुभ असणार आहे.
महिन्याच्या मध्यापासून तुम्हाला वैवाहिक जीवनात शांतता राखावी लागेल. घरात सुख-शांती असणार आहे , इंटेरिअर बदलायचे असेल तर महिना चांगला आहे. मालमत्त्यावरून सुरू असलेला वादाचा निकाल लागू शकतो.