नमस्कार मंडळी
२०२३ वर्ष हे लवकरच सुरु होणार आहे आणि या वर्षी मेष राशीच्या लोकांच्या जीवनात नक्की काय काय घडणारे यंदा तरी जे अविवाहित आहे त्यांची लग्न होतील का नोकरी मिळेल का ज्यांना नोकरीत बढती हवी आहे ती त्यांना मिळेल का करिअर कसा असेल कौटुंबिक पातळ्यांवर काही बदल होतील का चला जाणून घेउया कसे असेल मेष राशीसाठी येणारे हे २०२३ नवीन वर्ष –
आधी समजून घेऊ आर्थिक बाजू २०२३ या संपूर्ण वर्षात मेष राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होईल त्यांना आर्थिक स्थिरता सुद्धा येईल हे नक्कीच हा विचार तुमच्या मनाला सुखावून गेला असेल पण खर्च मात्र कायम राहणार आहे ११ व्या भावात शनी महाराजांची उपस्थिती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल आणि तुमचे उत्पन्नही उत्तरोत्तर वाढेल
परंतु बाराव्या भावात असलेल्या गुरुमुळे एप्रिल पर्यंत धार्मिक आणि इतर कार्यांमध्ये खर्च होत आहे तुम्ही खूप परोपकार सुद्धा कराल ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राहु बाराच्या भावात प्रवेश करेल तेव्हा उधळपट्टीचा काळ सुरू होईल आणि त्या काळात तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे अनावश्यक खर्चामुळे तुम्ही आर्थिक दबावाखाली येऊ शकता म्हणजे पैसा भरपूर येणार आहे
आर्थिक स्थिरता येणार आहे पण तुम्ही असाच खर्च करत राहिलात तर मात्र तुमच्यावर दबाव येईल गमावली नोकरी व्यवसायात काय होणार आहे 2020 मध्ये मेष राशीच्या लोकांच्या करिअरच्या दृष्टीने विचार करता चांगले परिणाम मिळतील वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमची गाडी रुळावर वेगाने धावू लागेल २०२२ मध्ये ज्या गोष्टी मनात तुम्ही ठेवल्या होत्या पण त्या करता आल्या नाही ते आता २०२३ मध्ये पूर्ण होते तुमच्या नोकरी ज्या अडचणी येत होत्या त्या सुद्धा दूर होतील
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि पाठबळ दोन्ही तुम्हाला मिळणारे तुमच्यासह कर्मचाऱ्यांचे सुद्धा चांगले सहकार्य मिळेल नोकरी चांगली कामगिरी करू शकाल आणि तुमची पदोन्नती सुद्धा होऊ शकते मार्च ते ऑगस्ट दरम्यान चांगल्या पदासह तुम्हाला चांगला पगार सुद्धा मिळेल ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल आणि तुमच्या करिअरमध्ये एकंदरीतच प्रगती पाहायला मिळेल व्यवसायाच्या दृष्टीने विचार करता हे वर्ष चढ-उतारांचा असेल
तुमच्या बिझनेस पार्टनर सोबत तुमच्या नात्यांमध्ये चढ-उतार येऊ शकतात त्यांना थोडा पाठिंबा द्या आणि त्यांच्या सोबत राहा मात्र त्याच बरोबर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा असं केल्याने तुमचा व्यवसाय हळूहळू वाढण्याची शक्यता आहे एप्रिलपासून व्यवसायात तेजी येईल आणि वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत तुमच्या व्यवसायात खूपच प्रगती होऊन कौटुंबिक विचार करता तुम्ही तुमच्या कामात जास्त व्यस्त असतात आणि त्यामुळे कुटुंबाला वेळ कमी द्याल
इतकंच काय पण कामामुळे तुम्हाला कुटुंबापासून दूर जावे लागेल अशा परिस्थितीमुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास होईल परंतु वर्षाच्या मध्यात तुमचं लक्ष पुन्हा कुटुंबाकडे वळेल शुभ आणि मंगल कार्याचा आयोजन होऊ शकतात आणि त्या कार्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढेल वातावरण धार्मिक आणि आध्यात्मिक राहील एकंदरीत तुमच्या कुटुंबात यावर्षी आनंदीआनंद आहे अविवाहित लोकांसाठी हे वर्ष कसा असेल
या वर्षी अविवाहित मेष राशीच्या तरुण-तरुणींचा लग्न होण्याचे योग आहेत मे महिन्यापासून तुमच्या लग्नाच्या चर्चा सुरू होतील आणि वर्षाच्या शेवटच्या म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान तुमचा विवाह होऊ शकतो त्या दृष्टीने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आरोग्याच्या दृष्टीने मात्र २०२३ वर्षं मेष राशीसाठी कसा आहे तब्येतीच्या तक्रारी जाणवतील आरोग्याची विशेष काळजी घ्या
नियमित व्यायाम करा आणि त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या या वर्षी राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणारे त्यासाठी त्यांनी ज्योतिषी उपाय काय करावे २०२३ या वर्षी तुम्ही मंगळवारी दर मंगळवारी हनुमान चालीसा बुधवारी संध्याकाळी एखाद्या धार्मिक स्थळी काळे तीळ सुद्धा दान करा शक्य असल्यास गुरुवारी उपवास ठेवा आणि रोज स्नान केल्यानंतर कपाळावर हळद किंवा कुंकू लावा. या उपायांनी छोटे मोठे असो पण तुमचे चढ उत्तर सोपे जातील