कुंभ राशीचे संपूर्ण वर्षाचे भविष्य – चैत्र २०२२ पासून फाल्गुन २०२३ पर्यंत

नमस्कार मंडळी,

शनी महाराजांना अतिशय प्रिय असलेली राशी म्हणजे कुंभ राशी , कुंभ राशीच्या लोकांनी चालू वर्षाचे नियोजन कसे करायचे ते पाहुयात. चैत्रामध्ये कोणत्याही वादग्रस्त गोष्टींपासून बाजूला राहा. पौर्णिमेच्या आसपास तुम्हाला मोठे यश मिळणार आहे. या महिन्यात कलाकारांचे भाग्योदय होतील. उत्तरार्धात व्यापारी वर्गाला नफा होईल. त्यामुळे एकंदरीतच हा महिना तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागणार आहे.

वैशाखात कुंभ राशीला साडेसातीची जाणीव होईल. या महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत प्रत्येक बाबतीत विरोध अनुभवायला मिळेल. कोणतेही काम हे सहजासहजी होईल. विरोध , विलंब या गोष्टींचा अनुभव प्रत्येक बाबतीत येईल. पौर्णिमेनंतर मात्र तरुणांचे भाग्य होतील. काही जणांना छंद किंवा जोपासलेल्या गोष्टींमधून मोठा नफा होईल.

नोकरदार वर्गाला अचानक बढती मिळेल. ज्येष्ठामध्ये आर्थिक व्यवहार जरा जपून करायचे आहेत. सगळी सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे उधार पैसे कोणाला दिले असतील तर तुमचे नुकसान होऊ शकते. पौर्णिमेला कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. घरामध्ये शुभ कार्ये होतील.

दिवाळीमध्ये विवाह ठरतील. उत्तरार्धात घराचे स्वप्ने पूर्ण होईल आणि तुमच्या संततीचा भाग्योदय होईल. आषाढामध्ये शनी वक्री होत असल्याने दगदग होईल. गुरु शुक्रामुळे पौर्णिमेच्या आसपास एक चांगली बातमी मिळेल. उत्तरार्धात कायदेशीर प्रश्न किंवा समस्या निर्माण होतील. अमावस्येला एखादी फसवणुकीची घटना घडू शकते.

त्यामुळे त्या दरम्यान थोडे सावध राहा. श्रवणामध्ये तुम्हाला अशुभ गोष्टींचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांपासून त्रास होईल. ते विनाकारण एखाद्या गोष्टीचा जाच करतील. या महिन्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चिंता जाणून राहील. ज्या कुंभेच्या लोकांचा नुकताच विवाह झाला आहे, त्यांना वैवाहिक सुखांमध्ये कमतरता जाणवेल.

उत्तरार्धात मात्र चांगले ग्रहमान आहे आणि अमावस्येच्या नोकरदार वर्गास बदलीच्या योग येतील. भाद्रपदामध्ये पूर्वार्धात विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. ज्या लोकांना परदेशी जायची इच्छा आहे, अशांची परदेशवारी या महिन्यात घडणार आहे. उत्तरार्धात मोठ्या लोकांच्या मध्यस्तीमुळे मोठमोठी कामे मार्गी लागतील. तुमच्या मुलांपासून सुख समाधान मिळेल.

नोकर दार वर्गासाठी आनंदाची बातमी म्हणजे ह्या महिन्यात त्यांची पगारवाढ होईल. अमावस्येला मात्र आरोग्याची काळजी घ्या. सांधे दुखी स्नायू दुखी , अशी शारीरिक दुखणे होण्याची शक्यता आहे. अश्विनात नवरात्रीमध्ये अग्नीपासून आणि धारदार शास्त्रापासून सावध राहा. नाही तर भाजण्याचा किंवा कापण्याचा एखादा प्रसंग घडू शकतो.

बुद्ध शुक्र यांच्या सह योगामुळे व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती होत राहील. पौर्णिमेला तर कुंभ राशीवर धन वर्ष होणार आहे. उत्तरार्धात आनंदाची बातमी मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. यंदाची दिवाळी कुंभेच्या लोकांची चांगली साजरी होणार आहे. कार्तिकात शुभ ग्रहांचे सहायय मिळणार आहे.

नोकरी आणि व्यवसायातले ताण तणाव कमी होतील.तुम्हाला चिंतामुक्ती असणारा हा महिना असणार आहे. मात्र या महिन्यात चांगल्या लोकांची सांगत धरा . सार्वजनिक कामांमध्ये चुकीचे पाऊले उचलू नका. प्रेम संबंध असणाऱ्या लोकांनी या महिन्यात थोडा संयम ठेवावा नाही तर प्रेम प्रकरणातून थोडा त्रास होऊ शकतो. अमावस्येला वाहनापासून पीडा होण्याची शक्यता असल्याने वाहने जरा जपून चालवा.

मार्गशीर्षात पूर्वार्धात वर्गाला चांगला नफा होईल. पौर्णिमेच्या आसपास कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घ्यायची गरज पडेल. घरामध्ये आजारपण यामुळे चिंता वाढेल. पौर्णिमेनंतर म्हणजे दत्त जयंती नंतर आर्थिक उत्कर्ष होईल. पैसा चांगल्या प्रमाणात यायला मदत होईल.

विशेष मान सन्मानाचे योग सुद्धा येतील. पौष महिन्यातील उत्तरार्धात वक्री मंगळाची दहशत संपेल. विद्यार्थी वर्गासाठी चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. परदेशात जाण्याकरता इच्छुक असणाऱ्या लोकांसाठी परदेशात जायची संधी सुद्धा उपलब्ध होईल. व्यापारी वर्गाचे जर एखादे कोर्ट प्रकरण सुरु असेल, तर त्यातून दिलासा मिळेल.

माघ महिन्यात तुम्हाला अनुकूल ग्रहमान नसेल, नियोजित कामांमध्ये अडथळे येतील , कोणतेही काम हे सहजासहजी होणार नाही, विचित्र लोकांच्या गाठी भेटी घडतील आणि त्यातून स्वतःला मनस्ताप होईल. तेव्हा अति भावनावश होऊ नका, नाही तर त्यातून स्वतःला त्रास करून घ्याल. पौर्णिमेच्या आस पास एखादी दुखापत होऊ शकते.

या महिन्याच्या उत्तरार्धात शुक्राच्या भ्रमणामुळे थोडासा दिलासा मिळेल आणि कामे मार्गी व्हायला सुरुवात होईल. फाल्गुन या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात गुरु शुक्र युतीमुळे ओळखीच्या माध्यमातून कामे मार्गी लागतील. स्वतःच्या वास्तूचे स्वप्न बघणाऱ्या लोकांचे स्वप्ने या महिन्यात पूर्ण होईल कारण या महिन्यात त्यांचे वस्तू विषयक काही व्यवहार होतील.

पौर्णिमेच्या आसपास घरामध्ये कलह होईल. बहीण भावामध्ये वाद होईल उत्तरार्धात नोकरीमध्ये बदली होईल. फक्त अमावस्येला घरातील लहान मुलांची जास्त काळजी घ्या नाही तर त्यांना त्रास होईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *