वाईट काळ संपला आता १ एप्रिल पासून या राशींच्या जीवनामध्ये शुभ घटना घडणार म्हणजे घडणार

नमस्कार मंडळी,

शुभ योग आणि घटिका जमून आल्या तर व्यक्तीचे नशीब चमकायला वेळ लागत नाही.दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस जवळ यायला वेळ लागत नाही.ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल ज्या राशीसाठी अनुकूल असतात तेव्हा त्या राशीचे नशीब चमकायला वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार ग्रहदशेचा सकारात्मक प्रभाव मनुष्याला शिखरावर घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरतो.

ग्रहनक्षत्राची अनुकूलता अचानक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागतात.जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती असुदे जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा अचानक परिस्थिती मध्ये बदल घडून येतात.दुःख दारिद्र्याचा काळ संपून नवीन प्रगतीच्या मार्गाने जाणार आहे.

असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आता या राशीच्या लोकांच्या जीवनात होणार आहे. १ एप्रिल पासून यांचे भाग्य चमकणार आहे.या राशीच्या लोकांच्या जीवनातील दुःख आणि यातना संपणार असून मांगल्याची सुरुवात होणार आहे.घरामध्ये , कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

जीवनात अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यशाचा नवीन काळ सुरु होणार आहे.भौतिक सुख समृद्धीचे कारक आणि वैभवाचे दाता शुक्र देव १ एप्रिल या दिवशी रशिपरिवर्तन करणार असून ते मेष राशीतून म्हणजे आपल्या स्वतःच्या राशीत म्हणजे वृषभ राशी मध्ये प्रवेश करणार आहे.

शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. ज्या राशीवर शुक्राची कृपा होते त्या राशींचे भाग्य जास्त चमकते.१ एप्रिलच्या दिवशी दुपारी शुक्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राचा प्रभाव मानवी जीवनामध्ये अनेक गोष्टींना प्रभावित करतो. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांच्या जीवनामध्ये शुक्राचा उदय होणार आहे.

मेष – शुक्राचे होणारे परिवर्तन हे मेष राशीसाठी अतिशय लाभदायक होणार आहे.आर्थिक बाजू मजबूत होणार असून अचानक धन लाभाची शक्यता आहे.गेल्या अनेक दिवसापासून अडलेला पैसा आता या राशीच्या लोकांना मिळणार आहे. वाणी मध्ये काही बदल होणार असून भाषाशैली मधुर होणार आहे.शुक्र हा या राशीच्या दुसऱ्या भावामध्ये गोचर करत आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे दिवस येणार असून वैवाहिक जीवन सुखी होणार आहे.

वृषभ – होणाऱ्या शुक्राचे आगमन एखाद्या वरदानासारखे घडणार आहे. हे परिवर्तन अनेक सकारात्मक बदल घडवून आणणार आहे . मानसन्मान मध्ये वाढ होणार असून पद प्रतिष्ठा वाढणार आहे.शत्रूवर विजय प्राप्त करू शकता. नवीन व्यापार किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी हा उत्तम काळ आहे.कुटुंबामध्ये सुखाचे वातावरण येणार असून परिवाराचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.

कर्क – उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचे नवीन मार्ग प्राप्त होणार आहे.अडलेली कामे मार्गी लागतील. कठीण परिस्थितीमध्ये संकटाचा सामना करण्याचे बळ आता मिळणार आहे.

सिंह – शुक्राचा होणार गोचर सिंह राशीच्या दशम भावात होणार असून याचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशीवर पडणार आहे.स्वतःच्या सामर्थ्याला सिद्ध करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. घर , जमीन अथवा वाहन खरेदीने योग येऊ शकतात. अनेक दिवसापासून अडलेला पैसे आता या राशीच्या लोकांना मिळणार आहे.भौतिक सुख समृद्धीमध्ये वाढ दिसून येईल.

कन्या – शुक्राचे गोचर भाग्यात वृद्धी करणार असून अनेक पटींनी यश प्राप्त होणार आहे.या काळामध्ये घेतलेले निर्णय यशस्वी होणार आहे.विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाह जुळून येणार आहेत.वैवाहिक जीवनामध्ये आता सुखाचे दिवस येणार आहे. जोडीदाराबरोबर होणारे वाद कमी होण्याची शक्यता आहे.या राशीच्या लोकांना अध्यात्मिक सुख प्राप्त होणार आहे.

तूळ – शुक्राचे हे रशिपरिवर्तन तूळ राशीच्या अष्टम भावामध्ये होणार आहे.सुख समृद्धीची प्राप्ती होणार असून मन अतिशय प्रसन्न होणार आहे. आथिर्क बाजू वाढणार असली तरी खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. अनावश्यक खर्च करणे टाळा.घर परिवारातील वातावरण प्रसन्न बनेल.योजलेल्या योजना सफल बनतील.

मकर – शुक्राचे हे गोचर या राशीच्या पंचम स्थानामध्ये होणार आहे. संतती कडून एखादी शुभ वार्ता कमी पडू शकते . कार्यक्षेत्रामध्ये धन लाभाचे योग मिळणार असून प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होणार आहे.प्रेम जीवनाविषयी हा काळ शुभ ठरणार आहे.वैवाहिक जीवन सुख समाधानाने फुलून येणार आहे.

कुंभ – शुक्र या राशीच्या चौथ्या भावामध्ये गोचर करत आहे.या काळामध्ये घर , जमीन किंवा वाहन खरेदीचे योग मिळू शकतात . आर्थिक बाजू मजबूत होणार असली तरी पैसा जपून खर्च करा.अनेक वेळापासून अपूर्ण राहिलेलं प्रेम प्राप्तीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *