नमस्कार मंडळी,
आज काळ च्या धावपळीच्या जगामध्ये , स्वतःचे पोट भरण्यासाठी खूप धडपड करावी लागते, लोकांना खुप कमी वेळ मिळतो आपल्या साठी देवा साठी , घरासाठी आज आपण असा एक मंत्र बघणार आहोत ज्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, कोणतीही इच्छा असू किंवा तुम्हाला काही हवे असुद्या तुम्ही फक्त ह्या एका मंत्राचा जाप करा.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील . स्वामींचे भक्त असाल किंवा जर तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर ते तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वामींची सेवा करताना कोणताही लालचीपणा नसावा, कोणतीच इच्छा नसावी . स्वामी सर्वगामी आहेत ज्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव असते म्हणूनच त्यांना सृष्टीचे कर्ते बोलतात ,
ज्यांनी हि सृष्टी घडवली आणि त्या मध्ये एक हि चूक त्यांनी केली नाही. स्वामींच्या भक्तीमध्ये खूप ताकद आहे असे म्हणतात , खूप मंत्र आहेत ज्यामध्ये गोष्टी खऱ्या करण्याचे सामर्थ्य आहे . खूप चमत्कारी शक्ती आहेत. ह्या अशा काही मंत्राचा जाप केला मनापासून त्यांची पूजा केली तर आपल्याला हवे ते मिळते ,
आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात.स्वामींना सगळे माहित असते आपल्या भक्ताला काय हवे आहे काय नाही . ते आपल्या भक्ताच्या श्रद्धेला धावून येतात , त्यांच्या कृपेने सगळ्या समस्या दूर होतात. आज आपण असाच एका मंत्राविषयी सांगणार आहे ज्याचा मनापासून श्रद्धेने आणि भक्तिभावाने न चुकता जाप केला
आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आपल्याला हवे ते मिळेल. सगळी विघ्न दूर होतात. ह्या मंत्राला इच्छापूर्ती मंत्र असे हि बोलले जाते. चला तर जाणून घेऊ असा कोणता मंत्र आहे ते – हा मंत्र गणेशाचा मंत्र आहे , प्रत्यके शुभ कार्यामध्ये आणि सेवेमध्ये गणपती ची पूजा सर्वप्रथम केली जाते , त्यांचा आशीर्वाद हवा असतो .
म्हणून ह्या मंत्राचा जाप अवश्य केला पाहिजे. हा मंत्र इच्छा पूर्ती , विघ्न दूर करणारा, इच्छा ची पूर्ती करणारा मंत्र आहे.
हा मंत्र काहीसा असा आहे -ॐ गं गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाः
एकदम सोपा असा हा मंत्र आहे, ह्या मंत्राची एक माळ जपायची आहे म्हणजेच तुम्हाला १०८ वेळा ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळी हाथ पाय स्वच्छ धुवून देवासमोर बसून ह्या मंत्राचा मनापासून जाप करायचा आहे. जाप केल्याने मनातली इच्छा पूर्ण होईल, सगळ्या समस्या दूर होऊन आयुष्यामध्ये आनंद येईल.
ह्या मंत्राचा जाप नक्की करा आणि सतत स्वामींवर तुमची श्रद्धा आणि भक्ती अशीच राहूद्या.