या मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्यदेवांना नक्की अर्पण करा ही एक वस्तू

नमस्कार मंडळी,

१४ जानेवारी शुक्रवार या दिवशी मकर संक्रांतीचा सण आलेला आहे या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण सुरू होतं मित्रांनो हा अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस आहे सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी जी व्यक्ती या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करते

त्या व्यक्तीला नवीन उर्जा शक्ती तेजस्विता आणि आरोग्य प्राप्त होतं याचबरोबर यश कीर्ती आणि समाजामध्ये मान-सन्मान मिळतो त्यामुळे सूर्यदेवाना प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत करण्यासाठी या मकर संक्रांतीला काही विशेष उपाय नक्की करावे मित्रांनो आज एक अत्यंत साधा सरळ अगदी एक ते दोन मिनिटात होणारा उपाय पाहणार आहोत

हा उपाय तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे या उपायामुळे तुमच्या जीवनातील गरिबी दरिद्रता कायमची निघून जाईल जर तुम्हाला एखादा आजार आहे किंवा घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा काही दिवसापासून एखाद्या आजारामुळे ग्रसित असेल तर या उपायांमुळे तुमचे आजारपण दूर होईल त्याच बरोबर जर कर्ज असेल कर्ज फिटत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल

धनधान्य संबंधित कोणतीही समस्या असेल तर ही समस्या सुद्धा या उपायामुळे नक्कीच दूर होईल चला तर जाणून घेऊया हा उपाय नक्की कसा करायचा तर आज हा उपाय करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठायचे आहे नित्य कर्मातून निवृत्त व्हायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत

त्यानंतर तांब्याच्या धातूपासून बनलेला ताब्यामध्ये जल घ्यायच आहे आता या जलमध्ये थोडेसे अक्षद थोडेसे काळे तीळ आणि एखादं लाल रंगाचे फूल टाकायच आहे. आणि त्याचबरोबर आपल्या हातामध्ये सुद्धा थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आता सूर्यदेवाला जेव्हा आपण हे जल देणार आहोत हे जल अर्पण करणार आहोत

त्या आधी हातामध्ये जे थोडेसे काळे तीळ आहेत ते सूर्याकडे फेकायचे आहेत पूर्व दिशेला सूर्य देवा कडे बघून हे थोडेसे काळे तीळ फेकायचे आहेत आणि या वेळी ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः ओम मित्राय नमः ओम आदित्याय नमः असे सूर्यदेवाच्या नावाचा जप करायचा आहे.

जर हि सर्व नावे तुम्हाला येत नसतील तर फक्त ओम सूर्याय नमः या नावाचा बारा वेळा उच्चार करायचा आहे आता मनोभावे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत जी काही दुःख आहेत आपली जी काही इच्छा आहे ते बोलून दाखवायचे आहे आपला शत्रु नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आहे

त्यानंतर फुल तांदूळ आणि तीळ ह्या तिन्ही विशेष पदार्थांच्या जलाने सुर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे हे जल सूर्य देवांना अर्पण करायचं आहे. या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकट गरिबी दरिद्रता याचा नाश होईल याच बरोबर कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होईल आणि सूर्य ग्रह मजबूत झाल्याने समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल तुम्ही जे कार्य हाती घेता

त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल चांगलं आरोग्य लाभेल आणि शत्रूंचा नाश होईल तर मित्रांनो मकर संक्रांतीला हा अगदी छोटासा आणि सोपा उपाय नक्की करून पहा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *