नमस्कार मंडळी,
जर तुम्हाला शक्य असेल तर आज आवळ्याच्या वृक्षाची पूजा नक्की करा भगवान श्रीहरी श्री विष्णूची व माता लक्ष्मीची सर्व विधिवत पूजा करा. आज केलेले उपाय हे आपल्याला जीवनामध्ये सर्व सुख प्रधान करतात आणि अंतिमतः वैकुंठ धम ची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. ज्यांच्या घरांमध्ये गरिबी दारिद्र्य आहे
त्यांनी तरी आमलकी एकादशी चे व्रत आवर्जून करावा. धन प्राप्ति साठी काही छोटे-छोटे उपाय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण आज घरामध्ये सकाळी लवकर उठून भगवान श्री हरी श्री विष्णूंच व माता लक्ष्मीचे पूजन करावं संपूर्ण दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा.
तुळशीच्या माळेवर अखंड हा जप केल्यास भगवान विष्णूची अखंड कृपा आपल्यावर बरसते. आणि घरामध्ये सुख समृद्धीचा वास निर्माण होतो. ज्यांच्यावर ती मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. कर्जाचा डोंगर झालेला आहे. अशा लोकांनी कर्जतुन मुक्ती मिळण्यासाठी कर्ज कमी करण्यासाठी तांब्याभर पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून हे साखर मिश्रित जल वटवृक्षस अर्पण करावा.
अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. आणि सायंकाळी म्हणजे सूर्यास्ता समय पिंपळाच्या वृक्षाखाली एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा नक्की प्रज्वलित करावा. या पिंपळाच्या वृक्षाचा आज प्रदक्षणा घालाव्या सात नऊ अकरा या संख्येमध्ये या प्रदर्शनात घालाव्या.
आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या कर्ज समस्या आहेत त्या दूर करण्याची प्रार्थना आपण भगवान श्री हरी विष्णूंना करावी. पिंपळाच्या वृक्षांमध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णू प्रत्यक्ष वास करत असतात. कर्जमुक्तीचा हा अंत्यंत सफल असा एक उपाय आहे. आज सायंकाळी माता तुळशी जवळ जाऊन आपण एक तुपाचा दिवा त्याही ठिकाणी प्रज्वलित करा.
हे तूप शक्यतो गोमातेचं असावा. इतर कोणत्याही पशुच चालत पण त्या तुपात आपण थोडीशी हळद टाकणे गरजेचे आहे. तुळशीजवळ दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. माता तुळशीला प्रार्थना करा की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे. धन, वैभव, ऐश्वर्या, पैसा, संपत्ती या तिन्ही गोष्टी आपल्या वास्तूमध्ये निर्माण होऊ देते.
तुळशीच्या परिक्रमा म्हणजे प्रदक्षणा पण घालायच्या आहेत. अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत. या प्रदक्षिणा घालताना मंत्राचा जप सातत्याने करणे गरजेचे आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी शांतता सकारात्मकता धन वैभव पावित्र्यात घरामध्ये निर्माण होते. घरातील लोक एकमेकांबरोबर प्रेम भावनेने वागू लागतात.
सुख समृद्धीचा वास आपल्या घरांमध्ये निर्माण होतो. याच बरोबर एक महान उपाय आज आपण भगवान श्री हरी श्री विष्णू यांची आणि माता लक्ष्मीची पूजा तर आपण केली असेलच. आज रात्री सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर एक छोटासा काम आपण करायचा आहे. ९ वातींचा दिवा तयार करून.
म्हणजेच एका दिव्यामध्ये ९ वाती तयार करायचे आहेत. या ९ वातीचा दिवा प्रज्वलित करून भगवान श्री हरी श्रीविष्णू समोर हा दिवा प्रज्वलित करून अजून एक दिवा आपण भगवान श्री हरी श्रीविष्णू समोर अखंडित चालू राहील असा ठेवायचा आहे. हा दिवस संपूर्ण रात्र जळत राहील याची आपण जरा काळजी घेतली पाहिजे.
आणि संपूर्ण रात्रभर भगवान श्रीहरी श्री विष्णूंचे स्मरण केलं त्यांचा नावाचं जप केल्यास ओम नमो नारायणा , किंवा ओम नमो वासुदेवाय असा जप केल्याने भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. आणि माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते. अत्यंत प्रभावशाली असे हे ज्योतिष उपाय आज आपण जाणून घेतले आहेत.