कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा हा साधा सोपा आणि शक्तिशाली उपाय , सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतील

नमस्कार मंडळी,

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा हा एक शक्तिशाली उपाय . लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि सर्व इच्छा ताबोडतोब पूर्ण होतील. स्वस्तिक हे शुभ संयोग देणारे आहे.शुभ घटनांना आमंत्रण देणारे आहे. अशुभ आणि नकारात्मक गोष्टीपासून बचाव होतो . स्वस्तिक हे खूप महत्वाची गोष्ट आहे

कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मी माता भ्रमण करते , घरोघरी येते आणि ज्या व्यक्तीने मनोभावे पूजा केली त्याच्या घरी लक्ष्मीची कृपा होते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सुद्धा हा एक साधा सोपा आणि शक्तीशाली उपाय नक्की करा . हा उपाय तुम्ही कधीही करू शकता , सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे कोणत्याही एका वेळी करू शकता.

तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी एक पाट ठेवायचा आहे. जर देवघरात जागा असेल तर पाट नाही ठेवला तरी चालेल. तुम्हाला देवघरात लाल कुंकुने एक स्वस्तिक काढायचा आहे. कुंकू थोडेसे ओले करून त्याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे. यांनतर त्या स्वस्तिक ची तुम्ही हळदी कुंकू टाकून पूजा करायची आहे. हे सगळे झाल्यानंतर एका वाटीमध्ये तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्यायच्या आहेत.

घरात असलेलं तांदूळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तांदूळ घेतल्यांनंतर तुम्हाला एक एक तांदूळ असे करता करता १०१ तांदळाचे दाणे त्या स्वस्तिक ठेवायचे आहे आणि हे ठेवत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा शक्तिशाली मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र काहीसा असा आहे – ओम हीं श्रीमं महालक्ष्मेय नमः

स्वस्तिक काढल्यानांतर तांदळाचा एक दाणा हातामध्ये घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम हीं श्रीमं महालक्ष्मेय नमः , असे १०१ वेळा करायचे आहे. म्हणजे १०१ वेळा तुमचा ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. हे सगळे झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे कि तुम्ही बरकत व्हावी, समस्या संकटे सगळे दूर व्हावेत आणि सगळ्या इच्छा पूर्ण कर.

हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला १०१ तांदळाचे दाणे तुम्हाला एका सफेद कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये बांधायचे आहे . आणि हे बांधलेले तांदूळ तुम्हाला घराच्या तिजोरीमध्ये , दुकानाच्या गल्ल्यामध्ये किंवा जिथे कुठेही तुम्ही पैसे दागिने ठेवता तिथे ठेवायचे आहे. माता लक्ष्मीची कृपा म्हणून तुम्हला हे तांदूळ ठेवायचे आहे.

आणि ते स्वस्तिक त्या दिवशी तसाच राहून द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी तुम्ही देवाची पूजा कराल तेव्हाच तुम्हाला ते पुसून टाकायचे आहे. हा उपाय नक्की करून पहा पण हा उपाय तुम्ही अगदी मनोभावे आणि पूर्ण विश्वासाने करा ह्याचा फायदा नक्कीच तुम्हाला मिळेल.

माता लक्ष्मीची मनापासून उपासना केली तर देवी नक्कीच प्रसन्न होते आणि तिची कृपा सदैव तुमच्या वर राहते. आर्थिक संकटे दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदते. कुटुंबामध्ये सुखाचे दिवस येतील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *