नमस्कार मंडळी
हिंदू धर्मामध्ये सूर्य आणि चंद्र ग्रहणाला विशेष महत्व प्राप्त आहे, तसेच ज्या दिवशी सूर्य ग्रहण असते, त्या दिवशी अनेक नियम पाळले जातात. या वर्षी २०२२ मध्ये २ सूर्यग्रहण आहेत. ३० एप्रिलच्या मध्यरात्री या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण होणार आहे, मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे कोणतेही नियम पाळले जाऊ नये असे सुद्धा सांगण्यात येत आहे.
मात्र हे सूर्यग्रहण अर्धवट असेल, हे ग्रहण १२ वाजून १५ मिनिटांनी सुरु होईल आणि पहाटे ४ वाजेपर्यंत चालेल. तसेच ग्रहण मेष राशीमध्ये होणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या ग्रहणाचे महत्व वाढते. पण वैयक्तिक दिनदर्शिकेनुसार हे ग्रहण भारतात दिसणार नाही. म्हणजे ते दिसणार नाही आणि सुतक काळ असणार नाही.
हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या नैऋत्य भागात प्रशांत महासागरावर , अटलांटिक आणि दक्षिण ध्रुवावर दिसणार आहे. पण अर्थातच ग्रहांचा परिणाम राशींवर होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा ग्रहण असते तेव्हा त्याचा परिणाम राशींवर होत असतो. पृथ्वीवर होतो त्यामुळे मानवी जीवनावर सुद्धा ग्रहणाचा परिणाम होतो. १२ राशींपैकी ३ राशी अशा आहेत ज्यांना या ग्रहणाचा शुभ परिणाम होणार आहे.
चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या ३ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे-
वृषभ राशी – वृषभ राशी साठी हे सूर्य ग्रहण लाभदायक असणार आहे. सूर्य ग्रहांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच दीर्घ काळ रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन व्यावसायिक संबंध सुद्धा पूर्ण होतील. या वेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो तसेच तुमच्या मुलांच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल.
कर्क राशी – हे ग्रहण या राशीसाठी सुद्धा विशेष असणार आहे. तसेच या काळात कामाच्या ठिकाणी आणि समाजात तुम्ही प्रतिमा चांगली होऊ शकते. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. तयाचबरोबर कामाच्या ठिकाणी तुम्ही कार्यशैली सुद्धा सुधारू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑफिस मध्ये प्रशंसा मिळू शकते. त्याच बरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोकांचे सहकार्य मिळेल. नवीन योजनांवर काम करू शकता.
धनु राशी – सूर्य ग्रहणाच्या प्रभावाने तुम्हाला व्यवसाय आणि करिअर मध्ये यश मिळू शकते. व्यवसायात भागीदारीचे काम सफल होऊ शकते. त्याच बरोबर जोडीदाराबद्दल चे नाते अधिकच मधुर होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. या काळात तुम्ही ताकत सुद्धा वाढेल. गुप्त शत्रूंचा नाश होईल. आणि धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि सूर्य हे मित्र आहेत. त्यामुळे हे ग्रहण तुमच्या साठी फायदेशीर असणार आहे.