Marathi Manus

Stay Up to Date With Us

वैशाख पौर्णिमेला राशीनुसार दान केल्यास होणार भरघोस लाभ; तुमच्या राशीला कोणते दान आहे नक्की पहा

नमस्कार मंडळी

हिंदू धर्मात पौर्णिमेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. वैशाख महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील साजरी करतात . या दिवशी स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी राशीनुसार दान करणे शुभ सिद्ध होत असते . त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया

यंदा वैशाख पौर्णिमा १६ मे रोजी आलेली आहे . ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व असते . या दिवशी स्नान आणि दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केली जाते .

या दिवशी उपवास करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि राशीनुसार ज्योतिष शास्त्राने सुचवलेले दान केले पाहिजे असे सांगितले जाते.

मेष राशी – या राशीच्या लोकांनी या दिवशी जल दान केले पाहिजे . वैशाखाच्या रणरणत्या उन्हात जल दान करण्यासारखे दुसरे पुण्य कर्म नसते . यासाठी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपण जल व्यवस्था, पशु पक्ष्यांसाठी पाण्याचा छोटासा हौद बांधून घ्याल पाहिजे .
वृषभ राशी – या राशीच्या लोकांनी आगामी पावासाळ्याच्या दृष्टीने गरजू व्यक्तींना पावसाळी चपला, बूट, छत्री इत्यादी वस्तूंचे दान करायला हवे .

मिथुन राशी – ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा, टरबूज, खरबूज इत्यादी हंगामी फळांचे दान करणे गरजेचे आहे .

कर्क राशी – या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना छत्री दान करावी. तसेच कोणाला आवश्यक असल्यास एखादे विश्रांती स्थान उभारायला हवे . उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे दान केल्याने भगवान विष्णूची कृपा सद्यावं राहते, असे मानले जाते.

सिंह राशी – ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना शिधा अर्थात कोरे, न शिजवलेले धान्य दान करणे हे विशेष फलदायी असते . दान देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या मनोकामना पूर्ण होत असतात .

कन्या राशी – कन्या राशीचे लोक अनाथाश्रम किंवा बालआश्रमात शैक्षणिक उपयोगी गोष्टी दान करू शकतात. उदा., वह्या-पुस्तक तसेच पंखा, कुलर किंवा धान्याचे दानही शुभ सिद्ध होईल.

तूळ राशी – या राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सावली देणारी झाडे लावायला हवी . अर्थात शक्य तेवढे वृक्षारोपण करावे आणि इतरांनाही प्रवृत्त करावे .

वृश्चिक राशी – या दिवशी गरजू व्यक्तींना ऋतुमानाप्रमाणे पिकणाऱ्या फळांचे दान करणे शुभ मानले जाते.

धनु राशी – या राशीच्या लोकांनी धार्मिक स्थळांबाहेर तसेच एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्था करावे फायदेशीर ठरेल. दुसऱ्यांची तहान भागवल्याने तुमच्याही जीवनात गारवा कायम राहणार आहे .

मकर राशी – या राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पशु-पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी. त्यांच्या रूपाने त्रिदेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

कुंभ राशी – वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गरजूंना सुती कपडे दान करायला हवे . असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होत असतात .

मीन राशी – या राशीच्या लोकांनी यात्रेकरूंसाठी भोजन आणि पाण्याची व्यवस्था करावी. किंवा तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांना शिधा किंवा भोजनासाठी उपयुक्त अन्नाचे दान करायला हवे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.