नमस्कार मंडळी
२४ जून २०२२ शुक्रवार चा दिवस आणि या दिवशी योगिनी एकादशी आलेली आहे. दर वर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी बोलले जाते. एकादशीचे व्रत हे भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. हे व्रत जी व्यक्ती करते त्या व्यक्तीवर भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात
आणि त्यांच्या कृपेने त्या व्यक्तीला सुख , धन धान्य यांची कमतरता कधीच भासत नाही. जीवनातील कष्ट दुःख यसपासून त्या व्यक्तीला मुक्ती मिळते. योगिनी एकादशी तिथीस काही छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या दूर करू शकता.
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्यापूर्वी तिळाचे उटणे तुम्ही नक्की लावावे. सोबतच आवळ्याचा रस अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान केल्यास शुभ फळांची प्राप्ती होते असे हिंदू शास्त्रामध्ये सांगितले आहे. सोबतच या दिवशी तुम्ही या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा करावी.
त्यांना पिवळी फुले अर्पण करावी. पिवळ्या रंगाची फळे सुद्धा अर्पण करावीत. तसेच नैवेद्द करताना जर तुम्ही त्यामध्ये केसर किंवा चिमूटभर हळद जरी टाकली तरी त्यामुळे सुद्धा भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात. हे नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीची पाने अर्पण करावयास विसरू नका.
हे असे केले नाही तर मान्यता आहे कि भगवान विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाही. या दिवशी जर तुम्ही विष्णूंसमोर विष्णुसहस्त्र नामांचा पाठ केल्यास तुमच्या कुंडलीमध्ये असणारे दोष समाप्त होतात आणि धन प्राप्तीचे मार्ग अधिक सोयीचे होतात.
ज्या लोकांना शक्य असेल अशा लोकांनी या दिवशी केशर मिश्रित दुधाने भगवान विष्णूंचा अभिषेक नक्की करावा. या दिवशी गीतेचा पाठ केल्यास पितृ प्रसन्न होतात आणि पित्रूच्या कृपा आशीर्वादाने जीवन सुखी बनते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करत असताना तुम्ही त्यांच्या चरणी ११, २१ किंवा ५१ रुपये नक्की अर्पण करा.
आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशी संपन्न झाल्यानंतर स्नान करून हे पैसे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तुमच्या पैशामध्ये सतत वाढ होताना तुम्हाला जाणवेल. ज्या लोकांची भगवान विष्णूंवर श्रद्धा असेल त्यांनी एक बासरी चांगली सजवून मंदिरामध्ये अर्पण करावा.
सोबतच जाताना थोडीशी पिवळी मोहरी घ्यावी आणि हि मोहरी सुद्धा भगवान श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करून त्यातील थोडीशी मोहरी घरी येताना परत घेऊन यावी . घरी आल्यानंतर पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये हि मोहरी व्यवस्तिथ बांधावी , हे सर्व झाल्यानंतर हि पुरचुंडी आहे
हि तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे पैसे ठेवायची जागा असेल तिथे ठेवून द्यावी. हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी तर नांदते पण पैशामध्ये सुद्धा वाढ होऊ लागते. ज्या लोकांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झालेले आहे किंवा तुमच्या जीवनात जर शत्रू खूप वाढले असतील आणि त्रास देत असतील
तर अशा वेळी कर्जमुक्त होण्यासाठी आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी तुम्ही तांब्याभर पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकावी , जर तुमच्या कडे बत्ताशे असतील तर अति उत्तम , १ ते २ बत्ताशे त्या पाण्यामध्ये टाकावे , असे हे पाणी मनोभावे पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करावे.
सोबतच या पिंपळाखाली सूर्यास्ताच्या वेळी एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा नक्की प्रज्वलित करावा. आणि तुमच्या मनातील इच्छा तिथे व्यक्त करावी. या एकादशीच्या तिथीस केलेले हे उपाय तुम्ही मनोभावे करून पहा ,हे असे उपाय एकादशीला केल्यास मानवी जीवनातील समस्या नक्की दूर होतात ,
घरामध्ये सुख समृद्धी येते, पैशांची भरभराट होते , पण हे उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करावे.
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.