नमस्कार मंडळी,
उद्या २१ मार्च २०२२ , सोमवार चा दिवस आणि ह्या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी , हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ह्या संकष्टी चे अनन्य साधारण महत्व सांगितले गेले आहे. या दिवशी भगवान श्री गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा ची पूर्ती होते. जर अनेक वर्षांपासून तुमच्या मनामध्ये इच्छा आहे
आणि ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करा आणि पूजेमध्ये काही वस्तू त्यांना अर्पण करा , जेणेकरून भगवान श्री गणेश हे ६४ देवतांचे अधिपती आहे रिद्धी सिद्धी चे दाता आहेत. विघ्णहर्ता हे तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि इच्छा पूर्ण करतील.
तुमच्या विवाहामध्ये काही समस्या येत असतील तर ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनोभावे पूजा करा आणि पूजन केल्यानंतर ॐ वक्रतुंडाय हुं चा १०८ वेळा जप करा . जर तुमच्या घरामध्ये पोवळ्याची माळ असेल तर त्या माळेवर हा १०८ वेळा जप केला तरी चालेल. हा उपाय केल्याने विवाहकार्यामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील.
पती पत्नी मध्ये सतत भांडणे होत असतील , तुमची पत्नी जर तुमचे म्हणणे ऐकत नसेल , एखाद्याची पत्नी जर घर सोडून माहेरी गेली असेल तर अशा वेळी स्त्री ला वश करण्यासाठी , प्रेमिकेला वश करण्यासाठी लाल हकिक च्या माळेवर १०८ वेळा ॐ वक्रतुंडाय हुं जप करायचा आहे.
स्त्री वशीकरण ह्या उपायाने करू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि ह्या उपायाचा गैरवापर करू नये. पैशांची प्राप्ती करायची आहे किंवा घरात गरिबी आहे , मेहनत तुम्ही करता पण त्याचे फळ मिळत नसेल , हि पैशांची समस्या दूर करण्यासाठी , गरिबी दूर करण्यासाठी ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या अर्क काष्ट प्रतिमेचे पूजन करा.
अर्क काष्ट म्हणजे रुई च्या झाडापासून बनवलेली मूर्ती जी बाजारामध्ये सहज मिळते. तिचे पूजन केल्यास ऐश्वर्याची प्राप्ती होते.ज्यांच्या जीवनामध्ये शत्रू आहेत, लोक विनाकारण त्रास देत असतील , त्यांनी शत्रूला शांत करण्यासाठी ह्या दिवशी कडुलिंबाच्या लाकडापासून बनलेल्या गणपती बाप्पाचे पूजन करावे
शत्रू मुक्तीची प्रार्थना करावी आणि हस्ति पिशाचि लिखे स्वाहा ह्या मंत्राचा जप करा , तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा किंवा कोणी काही केलेले असेल तर ती निघून जाईल. संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना बाप्पाला लाल चंदनाचा टीका आणि लाल रंगाचे फुल अवश्य वहा
२१ दुर्वा नक्की अर्पण करा. जास्वदीं चे फुल नक्की अर्पण करा ते नसेल तर झेंडू चे फुल सुद्धा चालेल. पूजा झाल्यानंतर गूळ किंवा मोदकाचा नैवेद्य नक्की दाखवा. गणपती बाप्पाची मनोभावे आणि पूर्ण विश्वासाने पूजा केली तर नक्कीच त्यांची कृपा होते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.