Marathi Manus

Stay Up to Date With Us

आज मंगळवार पासून ४० दिवस ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरतील फायदेशीर; मंगळाच्या संक्रमणामुळे होतील आर्थिक लाभ

नमस्कार मंडळी

ज्योतिषशास्त्रानुसार, १७ मे २०२२, मंगळवार रोजी मंगळ ग्रह कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि २७ जूनपर्यंत मीन राशीत असणार आहे . मंगळाचे हे संक्रमण अनेक राशींसाठी खूप फलदायी ठरणार असून . गुरु आधीच मीन राशीत विराजमान आहे.

परिणामी मंगळाच्या या संयोगाने मंगळ गुरु योग तयार होत आहे . या संयोगाचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे ते आपण जाणून घेऊया.

वृषभ राशी – ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या अकराव्या स्थानात मंगळाचे संक्रमण होणार असून . गुरु येथे आधीच विराजमान आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण लाभदायक असणार आहे. उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होण्याचे संकेत आहे ,

आर्थिक स्थिती सुधारेल आणि भविष्यातील योजनांमधून लाभ मिळणार आहे . व्यापार्‍यांना त्यांच्या मेहनतीचे शुभ फळ मिळणार आहे . आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे .

मिथुन राशी – मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील हे संक्रमण शुभ असणार . मंगळ त्यांच्या दशम भागात प्रवेश करणार आहे आणि गुरु ग्रह आधीच येथे उपस्थित आहेत . यानिमित्ताने येथे मंगल गुरु योग तयार होत आहे. या राशीच्या लोकांसाठी हे अत्यंत खूप शुभ असणार आहे .

या काळात कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा आणि वर्चस्व वाढणार आहे . एवढेच नाही तर या काळात जमीन, इमारत इत्यादी खरेदी होण्याची शक्यता आहे. या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळावे तसेच, रागावर नियंत्रण ठेवावे.

कर्क राशी – या राशीच्या लोकांसाठीही हा संयोग विशेष फलदायी ठरणार आहे . या दरम्यान तुम्हाला मनःशांती जाणवेल. नोकरी आणि व्यवसायात वर्चस्व असणार आहे . हा काळ उत्साही असणार आहे . कठोर परिश्रम कराल, त्याचे फळ सकारात्मक असणार आहे . या काळात विरोधकांपासून सावध राहावे लागेल. धार्मिक प्रवासाला जाता येणार आहे .

तूळ राशी – या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण संमिश्र ठरणार आहे . या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता असणार आहे . नशिबाने आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कला क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा होणार आहे . या काळात कोणतेही चुकीचे काम करणे टाळा. अन्यथा कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागणार आहे . वाहन चालवताना काळजी घ्या.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.