नमस्कार मंडळी,
आज पाहुयात कर्क राशीची पूर्ण ४ वर्षाची भविष्यवाणी. कसे असतील पुढील ४ वर्ष २०२१ ते २०२५ कर्क राशीसाठी. कर्क राशीच्या लोकांसाठी भरपूर आनंद , सन्मान , पुरस्कार व भेटवस्तू या ४ वर्षात मिळणार आहे.
उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल पण पुढे कोणतेही पाऊल टाकताना मोठे काम करताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे जरुरी आहे. परदेशी जाण्याचे स्वप्न बघत असाल तर तुमची मेहनत फळाला येणार आहे. जर तुम्ही उत्साही आणि रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवले तर हे वर्ष खूप भरभराटीचे जाणार आहे.
उद्योग ,व्यवसाय , व्यापारामध्ये भरभराट होईल, प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष आश्चर्यकारक असेल. आर्थिक प्राप्ती मध्ये अडथळे येतील पण सर्व अडथळे या काळामध्ये दूर होऊन धनलाभाचा योग जुळून येईल. कुटुंबाकडे लक्ष देणे जरुरी आहे. कुटुंबाप्रती असलेल्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.नोकरीमध्ये यश मिळेल.हा काळ मानसिक ताण तणाव दूर करणारा असेल. तुम्ही एक सक्षम आणि कुशल योद्धा आहात. विवाहाचे योग जुळून येतील. ज्या लोकांचे लग्न जुळून येत नाही त्यांच्या साठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे.
कर्क राशीच्या वैवाहिक लोकांसाठी हा काळ उत्तम जाणार आहे. कुटुंबामध्ये परिस्थिती हाताळली नाही तर कटुता येऊ शकते. कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव खूप संवेदनशील असतो आणि ह्याच स्वभावामुळे तुम्ही तुमची कौटुंबिक जबाबदारी नीट पेलवू शकता. अचानक धन लाभाचे साकेत आहेत.वर्षाचा मध्य काळ थोडा कठीण जाणार आहे.
कर्क राशीच्या लोकांनी या काळामध्ये अनावश्यक खर्च करणे टाळा.कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी नीट विचार करून घ्या किंवा कुठेही गुंतवणूक करताना मोठ्या माणसांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोणावरही पटकन विश्वास करू नये. तुमच्या दृढ आणि जिद्दी स्वभावाने तुम्ही हाती घेतलेली सगळी कामे पूर्ण कराल .
समाजामध्ये तुमचा मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा वाढेल. हा काळ तुमच्यासाठी मानसिक दृष्ट्या थोडा आव्हानात्मक असेल म्हणून स्वतःला बळकट ठेवण्याचा प्रयन्त करा. आरोग्याची विशेष काळजी या काळामध्ये घ्यावी लागणार आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयन्त करा, त्यासाठी ध्यान आणि योगा करा. एकंदरीत हा काळ कर्क राशीच्या लोकांना संमिश्र स्वरूपाचा असणार आहे.
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका. धन्यवाद.